Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अदानींना धक्का, मॉरिशस गुंतवणूकदारांची खाती गोठवली, ४३ हजार ५०० कोटींच्या शेअर्सचा व्यवहार थांबला!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Gautam adani

मुक्तपीठ टीम

भारत आणि आशिया खंडातील दुसऱ्या नंबरचे श्रीमंत बिजनेसमॅन गौतम अदानींना मोठा धक्का बसला आहे. नॅशनल सिक्युरिटी डिपॉजिटरी लिमिटेड (National Securities Depository Ltd) ने अदानी समुहात गुंतवणूक करणाऱ्या ३ परदेशी फंडची खाती गोठवली आहेत. यात अल्बुला इन्वेस्टमेंट, क्रेस्टा आणि एपीएसएस इन्वेस्टमेंट फंड्सच्या खात्यांचा समावेश आहे. यामुळे या तीन फंड कंपन्यांना अदानी ग्रुपच्या ४ कंपन्यांच्या ४३ हजार ५०० कोटींहून अधिक किंमत असलेल्या शेअर्समध्ये आता व्यवहार करता येणार नाही. समावेश आहे. NSDL च्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार ही खाती ३१ मे पर्यंत गोठवली गेली आहेत.

या तिन्ही खात्यांमधून अदानी एन्टरप्रायजेजमध्ये ६.८२ टक्के, अदानी ट्रान्समिशनमध्ये ८.०३ टक्के, अदानी टोटल गॅसमध्ये ५.९२ टक्के आणि अदानी ग्रीडमध्ये ३.५८ टक्के भागीदारी आहे. कस्टोडियन बँका, आणि परदेशी गुंतवणुकीचा कारभार सांभाळणाऱ्या कायदेशीर संस्थांनुसार या विदेशी फंड्सनी फायदेशीर मालकीबाबत (Beneficial ownership) संपूर्ण आणि स्पष्ट माहिती पुरवलेली नाही. या कारणामुळे त्यांची खाती गोठवली गेली असावीत. प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्डरिंग अॅक्ट (PMLA) नुसार कायदेशीर मालकीसंदर्भात संपूर्ण माहिती देणं आवश्यक आहे.

 

खाती गोठवली म्हणजे काय केलं?

  • खात्यांचे परिरक्षक त्यांच्या ग्राहकांना कारवाईसंदर्भातली सूचना देतात.
  • मात्र फंड्सचा व्यवहार करणाऱ्यांकडून यासंदर्भातली माहिती दिली गेली नाही तर खाती गोठवली जाऊ शकतात.
  • याचा अर्थ यास्थितीत फंड्सची खरेदी विक्री करता येणार नाही.
  • अदानींच्या या प्रकरणात NSDL, SEBI आणि अदानींच्या ग्रुपला पाठवलेल्या ईमेलला माहिती स्वरुपात सहकार्य केलं गेलं नाही.
  • अल्बुला इन्वेस्टमेंट, क्रेस्टा आणि APMS इन्वेस्टमेंट फंड्ससोबतही संपर्क होऊ शकला नाही.
  • सेबीकडे या तिनही फंड्सची परदेशी गुंतवणूकदार म्हणून नोंद आहे. मॉरिशसमधून त्यांचं कामकाज चालतं.
  • या तिन्ही गुंतवणुकदारांचा पत्ता पोर्ट लुई शहरातील आहे.
    तसंच त्यांची कोणतीही वेबसाईट नाही.
  • या तिन्ही गुंतवणूकदारांना २०२० पर्यंत नियमांचं पालन करण्यासंदर्भातल्या सूचना केल्या गेल्या होत्या.
  • नवीन नियमांचं पालन न करणाऱ्या फंड्सची खाती गोठवली जातील, असंही सेबीने स्पष्ट केलं होतं.
  • सेबीच्या नव्या नियमांनुसार FPI ला फंड्सच्या मालकीसंदर्भात आणि फंड मॅनेजर्सची खासगी माहिती देणं बंधनकारक होतं.

 

सेबीकडून अदानी समुहाच्या शेअर्समधील तेजीचीही चौकशी

  • सेबी अदानी ग्रुपच्या शेअर्सच्या किंमतींचीही चौकशी करत आहे.
  • गेल्या वर्षभरात या कंपन्यांच्या शेअर्समध्ये २०० ते १००० टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे.
  • सेबीने याप्रकरणाचीही २०२० पासून चौकशी सुरु केली आहे.
  • शेअर्सच्या किंमतींवरुनही सुरु झालेल्या चौकशीला अदानी ग्रुपकडून कोणताही प्रतिसाद देण्यात आलेला नाही.

Tags: adani groupgautam adaniNational Securities Depository Ltdनॅशनल सिक्युरिटी डिपॉजिटरी लिमिटेडसेबी
Previous Post

कृषी विभागाचा शेतकऱ्यांना महत्वाचा सल्ला: पेरणीची घाई नको!

Next Post

सुशांत सिंग राजपूत: वर्ष उलटलं! तपास कमी, राजकारणच जास्त रंगलं!!

Next Post
Sushant Singh Rajput

सुशांत सिंग राजपूत: वर्ष उलटलं! तपास कमी, राजकारणच जास्त रंगलं!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!