मुक्तपीठ टीम
डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने देशांतर्गत अत्याधुनिक शस्त्रास्त्र यंत्रणा विकसित केली आहे. त्यामुळे सशत्र दलांच्या युद्धविषयक क्षमतांमध्ये सुधारणा झाली आहे. त्यामुळे आपलं लष्कर आता तंत्रज्ञानाच्या बाबतीत अधिक सक्षम आहे. डीआरडीओने विविध तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये उत्पादने आणि यंत्रणा विकसित करण्यासाठी प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यापैकी काही उत्पादने आणि यंत्रणा खालीलप्रमाणे आहेत.
- क्षेपणास्त्रे यंत्रणा
- हवाई हल्ल्याची आगाऊ सूचना देणारे आणि टेहळणी करणारे उपकरण
- लढाऊ विमाने
- लढाऊ वाहने
- पूल बांधणे आणि उत्खननाच्या यंत्रणा
- मार्गदर्शित युद्धसामग्री
- तोफखान्यातील तोफा आणि रॉकेट्स
- छोटी शस्त्रे आणि युद्धसामग्री
- आधुनिक टॉर्पेडो आणि ध्वनीलहरींवर आधारित आधुनिक पोशाख
- इलेक्ट्रॉनिक युध्द (EW) यंत्रणा
- दीर्घ पल्ल्याचे रडार
- कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित यंत्रणा
वर्ष २०२०-२१ मधील अर्थसंकल्पीय तरतुदीत २३.७८%ची म्हणजेच २१,४१५.४१ कोटी रुपयांच्या वाढ करत वर्ष २०२१-२२ मध्ये आधुनिकीकरण निधी संपादन या शीर्षकाखाली १,११,४६३.२१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
मंजूर झालेल्या निधी संपादन योजनेनुसार तसेच विद्यमान संरक्षणविषयक खरेदी प्रक्रियेनुसार आधुनिकीकरणाच्या प्रकल्पांची प्रगती होत आहे.
राज्यसभा सदस्य कांता कर्दम यांनी राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तराद्वारे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी ही माहिती दिली.