Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नक्षलवादाला खतपाणी घालणार्‍यांच्या विरोधातील वैचारिक लढाई जिंकणे आवश्यक! – अधिवक्ता रचना नायडू

August 9, 2022
in घडलं-बिघडलं
0
Adv Rachana Nayadu

मुक्तपीठ टीम

नक्षलवाद हा देशाच्या अंतर्गत सुरक्षेला असलेला सर्वात मोठा धोका आहे. भारतीय सैन्य बिकट भौगोलिक परिस्थितीत बंदूकधारी नक्षलवाद्यांविरोधात सक्षमपणे लढतच आहेत; मात्र ही लढाई लढत असताना ‘ग्रामीण लोकांच्या हत्या केल्या’, ‘महिलांवर अत्याचार केले’, ‘मानवाधिकाराचे उल्लंघन केले जाते’, असा दुष्प्रचार जेव्हा भारतीय सैन्याविरोधात केला जातो, तेव्हा त्या वैचारिक लढाईत आपण पराभूत होत आहोत. बंदूकधारी नक्षलवादी फक्त २५ टक्के असून उर्वरीत त्यांचे ७५ टक्के मनुष्यबळ वेगवेगळ्या माध्यमांतून हा नक्षलवाद चालू ठेवण्यामध्ये कार्य करत आहे. नक्षलवादाला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पाठिंबा देणारे लेखक, पत्रकार, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते यांच्या विरोधातील वैचारिक लढाई जिंकणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन दुर्ग, छत्तीसगड येथील अधिवक्ता रचना नायडू यांनी केले. त्या हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘स्वातंत्र्याची ७५ वर्ष – आतापर्यंत नक्षलवाद का समाप्त झाला नाही ?’ या विषयावरील ऑनलाईन विशेष संवादात बोलत होत्या.

अधिवक्ता रचना नायडू पुढे म्हणाल्या की, नक्षलवाद्यांना सामान्य माणसांपासून ते राजकीय नेते आणि विविध क्षेत्रांतील लोकांपैकी ज्यांनी कोणी विरोध केला, त्या सर्वांना नक्षलवाद्यांनी वेचून ठार मारले आहे. नक्षलवाद्यांकडून ज्या लोकांसाठी लढण्याचा दावा केला जातो, त्यांनाच मारले जाते आहे, ही कुठली क्रांती आहे ? आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांपैकी कोणीही त्यांच्या विचारधारेशी जोडलेले नसतात, असे त्यांच्याशी संवाद केल्यावर लक्षात येते. नक्षलवाद्यांनी त्यांचा प्रभाव असलेल्या भागात अनेक हिंदूंची मंदिरे तोडली आहेत; मात्र चर्च किंवा अन्य प्रार्थनास्थळांचे नुकसान त्यांनी केल्याचे ऐकिवात नाही.

छत्तीसगडमधील अतिशय दुर्गम भागात असणारे नक्षलवादी जे राज्याच्या राजधानीपर्यंत सुद्धा पोहचू शकत नाहीत. ते ‘जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट’ला जाहीर समर्थन करणे, नागरिकत्व सुधारणा कायदा (सी.ए.ए.), तसेच बंगळुरू येथे गौरी लंकेशची हत्या झाल्यावर मात्र रस्त्यावर उतरताना दिसले. छत्तीसगड राज्याला पौराणिक, सांस्कृतिक इतिहास असतांनाही ‘नक्षलवाद्यांचे राज्य’ असा दुष्प्रचार केला जातो, हे थांबले पाहिजे, असेही अधिवक्ता नायडू शेवटी म्हणाल्या.


Tags: Adv Rachana NaiduNaxalismअधिवक्ता रचना नायडूनक्षलवादस्वातंत्र्याची ७५ वर्ष
Previous Post

#मुक्तपीठ #LiVE “काँग्रेस आक्रमक, भाजपा बॅकफुटवर!” काँग्रेस नेते जयराम रमेश यांचा दावा

Next Post

आजपासून प्रदेश काँग्रेसची सर्व जिल्ह्यांमध्ये आझादी गौरव पदयात्रा, सेवाग्राममधून शुभारंभ

Next Post
Azadi gaurav Padyatra

आजपासून प्रदेश काँग्रेसची सर्व जिल्ह्यांमध्ये आझादी गौरव पदयात्रा, सेवाग्राममधून शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!