Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आदिवासी वसतीगृहात ८ वी ते १२ वीच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याना प्रवेश

February 26, 2021
in घडलं-बिघडलं
0
k-c-padavi

मुक्तपीठ टीम

राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या ८ वी ते १२ वी तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांना कोरोना संसर्गाबाबत परिस्थिती पाहून आदिवासी विकास विभागाच्या वसतीगृहांमध्ये प्रवेश देण्यास मंजुरी देण्यात आली असल्याचे आदिवासी विकास मंत्री ॲड. के.सी. पाडवी यांनी सांगितले.

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनामार्फत टप्प्याटप्प्याने शाळा तसेच महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, शासकिय वसतीगृहे, नामांकित शाळा व एकलव्य निवासी शाळांमधील ५ वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यास मान्यता देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या व महाविद्यालयात नियमित जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आदिवासी विकास विभागाच्या वसतीगृहात प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धत राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामुळे नियमित शाळा तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची राहण्याची अडचण दूर होण्यास मदत होणार आहे.

राज्य शासनाच्या परिपत्रकात नमूद केलेल्या मार्गदर्शक सुचनांचा अवलंब करून शैक्षणिक वर्ष सन २०२० -२१ साठी वसतीगृह प्रवेश देण्यात येणार आहेत. स्थानिक कोरोना संसर्गाची स्थिती पाहता प्रकल्प अधिकाऱ्यांनी आरोग्य विभाग व स्थानिक प्रशासननामार्फत वेळोवेळी निर्गमित करण्यात येणाऱ्या सूचनानुसार विद्यार्थ्यांना वसतीगृहात राहण्याची परवानी देण्याचे निर्देशही परिपत्रकाद्वारे देण्यात आले आहेत.

आदिवासी विकास विभागाच्या सुमारे ४८६ शासकीय वसतीगृहांमध्ये दरवर्षी सुमारे ५५ हजार अनुसूचित जमातीमधील विद्यार्थांना प्रवेश दिला जातो. यंदाच्या शैक्षणिक वर्षातही वसतीगृह प्रवेश मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे.

 


Tags: k c padaviआदिवासी वसतीगृहआदिवासी विकास मंत्री ॲड. के.सी. पाडवीआदिवासी विकास विभाग
Previous Post

“आसवं गाळावी इतकी मराठी भाषा लेचीपेची नाही” – राज ठाकरेंचे मराठी माणसांना पत्र

Next Post

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट – आज ८ हजार ३३३ नवे रुग्ण, आज कुठे वाढला, कुठे घटला कोरोना?

Next Post
Corona Covid

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट – आज ८ हजार ३३३ नवे रुग्ण, आज कुठे वाढला, कुठे घटला कोरोना?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!