मुक्तपीठ टीम
भारतीय नौदलाचे प्रमुख सुपर स्पेशालिटी कमांड हॉस्पिटल ‘आयएनएचएस अश्विनी’ची धुरा सर्जन रिअर अॅडमिरल अनुपम कपूर यांनी शुक्रवारी, २४ डिसेंबर रोजी स्वीकारली. पश्चिम मुख्यालयातंर्गत झालेल्या प्रभावी समारंभात त्यांनी सर्जन रिअर अॅडमिरल आरती सरीन यांच्याकडून ‘अश्विनी’ची कमान हाती घेतली.
अॅडमिरल कपूर हे पुण्यातील प्रतिष्ठित आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत. ते प्रसूती आणि स्त्रीरोगशास्त्रातील तज्ज्ञ आहेत आणि त्यांनी लॅप्रोस्कोपिक आणि एंडोस्कोपिक स्त्रीरोग शस्त्रक्रियांमध्ये सुपर-स्पेशलायझेशन केले आहे. ‘अश्विनी’ची पूर्णवेळ धुरा स्विकारण्यापूर्वी, त्यांनी ‘अश्विनी’ आणि आर्मी हॉस्पिटल येथे स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून काम केले आहे आणि कोची येथील ‘आयएनएचएस संजीवनी ’चे कमांडिंग आॅफिसर होते.
अॅडमिरल आरती सरीन यांनी पदभार (कमांड) सोडल्यानंतर, त्या पश्चिम मुख्यालयाच्या ‘कमांड मेडिकल आॅफिसर’ म्हणून कर्तव्ये स्वीकारतील.