Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मराठवाड्यात कोरोनाविरोधात प्रशासनाची तयारी

February 19, 2021
in घडलं-बिघडलं
0
pruthviraj bp

मुक्तपीठ टीम

लातूर विभागातील लातूर, उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्यात कोरोना विषाणू संदर्भात प्रतिबंधात्मक उपययोजना अंमलात आणण्यासाठी तिन्ही जिल्ह्यांत प्रशासनाकडून बैठका घेण्यात आल्या.

 

लातूर जिल्ह्यात कोरोना सदृश्य रुग्णांची कोरोना निदान चाचणी होणे आवश्यक असून त्यासाठी लातूर जिल्हयातील शासकीय / खाजगी दवाखान्यात येणाऱ्या अशा रुग्णांची कोरोना निदान चाचणी करुन घ्यावी व चाचणीत रुग्ण्‍ पॉझिटिव्ह आढळून आल्यास त्वरित उपचार करावेत. जिल्हयातील मंगल कार्यालये आणि कोचिंग क्लासेस यांनी कोरोनाच्या निर्देशांचे पालन करावे असे लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी सूचित केले आहे.

 

औरंगाबाद जिल्हात कोरोनाच्या प्रतिबंधासाठी मार्गदर्शक सूचनांची यशस्वी  अंमलबजावणी करण्याचे जिल्हाधिकारी यांची निर्देश दिले आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व साथरोग अधिनियम 1897  कायदा अंतर्गत  जिल्ह्यात शासनाच्या  मार्गदर्शक सूचनांची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी  जिल्हाधिकारी यांनी परिपत्रकाद्वारे निर्देशित केले आहे.

 

परभणी जिल्ह्यात जमावबंदी आदेश जारी करण्यात आला आहे. हा आदेश संपूर्ण परभणी जिल्ह्याच्या हद्दीत दि. 16 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 7.00 वाजेपासून ते दि. 28 फेब्रुवारी  2021 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत (दोन्ही दिवस धरुन) लागू राहील.

 

जालना जिल्हात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दि. 15 फेब्रुवारीपासुन ते दि.16 मार्च  2021 चे रात्री 12 वाजेपर्यंत जालना जिल्ह्यात शासकीय, निमशासकीय कार्यालयात विविध संघटना, व्यक्ती यांना निवेदन सादर करतांना 5 व्यक्ती पेक्षा अधिक असणार नाही व उपोषण, मोर्चे, निदर्शने या करीता परवानगी देण्यात येणार  नाही यासाठी जिल्हाधिकारी यांनी फौजदारी  प्रक्रिया संहिता 144 चे प्रतिबंधात्मक आदेश लागू  केले आहे.

 

बीड जिल्हात कोरोना विषयक नियमांचा भंग करणाऱ्या मंगल कार्यालय व कोचिंग क्लासेसवर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी जारी केले आहेत.

 

उस्मानाबाद : विनामास्क आढळून आल्यास प्रथम 500 रुपयांचा दंड करण्यात येईल. पुन्हा तीच व्यक्ती आढळल्यास 1000 रुपये दंड व आपत्ती व्यवस्थापन कायदयानुसार कारवाई करण्यात येईल असे  उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले.

 

नांदेड : जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भावामुळे मृत्यूचे प्रमाण चिंताजनक असून याबाबत लोकांनी अधिक जागरुकता बाळगून तपासणीसाठी विश्वासाने पुढे सरसावणे आवश्यक आहे. इतर जिल्ह्याच्या तुलनेत ही चिंतेची बाब असून आरोग्य विभागानेही कोरोना तपासणीचा वेग अधिकाधिक कसा वाढेल याबाबत योग्य ते नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार डॉ. दिपक म्हैसेकर यांनी दिले. नांदेड जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव, आरोग्य विभागाची यंत्रणा आणि प्रशासनातर्फे केले जाणारे नियोजन याची आढावा बैठक डॉ. दिपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

35 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड : 18 फेब्रुवारी 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 58 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 28 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 30 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या  35  कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.


Tags: coronalaturnandedउस्मानाबादऔरंगाबादकोरोनाजमावबंदीजालनाडॉ. दिपक म्हैसेकरनांदेडपरभणीपृथ्वीराज बी.पी.बीडलातूर
Previous Post

“सार्वजनिक ठिकाणी मास्क नसल्यास पोलीस कारवाई करणार”

Next Post

गुन्हे थोड्यात: 1) पनवेल तालुक्यातील दापोली पारगाव येथे आई व मुलीची धारदार चाकूने वार करत हत्या केली, सदर घटना लग्नास नकार दिल्याने आरोपीने रागाच्या भरात आज सकाळी हे कृत्य केले असून यावेळी सदर मुलीचे वडिलसुद्धा जखमी झाले आहेत. 2) निफाड तालुक्यात मंगळवारी कारसुळ येथील महाविद्यायीन युवतीचा मृतदेह आढळला होता. दीपिकाचा चुलतभाऊ विक्रम गोपीनाथ ताकाटे याने मित्राच्या मदतीने तिचा खून केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. दीपिका व विक्रम यांच्यातील अनैतिक संबंधातूनच हा खून झाला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. 3)आर्थिक राजधानी मुंबईतील अमली पदार्थांच्या दलालीविरुद्ध नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने कारवाई सुरू केली आहे. त्यानंतर आता ‘हेरॉइन’, या महागड्या अमली पदार्थांचीही मुंबईत तस्करी होत असल्याचे दिसून येत आहे. या अमली पदार्थांसह एका आफ्रिकन महिलेला अटक केली आहे. 4) बनावट नोटा छापणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने चेंबुर परिसरातून अटक केली आहे. कर्ज फेडण्यासाठी त्याने बनावट नोटा छापण्याचे काम सुरु केले होते. आरोपी फकीयानने यूट्यूबवरुन नोटा छापण्याचे प्रशिक्षण घेतले होते. 5)विरारमध्येही एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पतीनं एकावर थेट अ‍ॅसिड फेकल्यानं आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पत्नीसोबत एका जीम मालकाचे विवाहबाह्य संबंध असल्याचा पतीला दाट संशय होता. त्या संशयातूनच पतीनं हे कृत्य केल्याची माहिती समोर आलीय.

Next Post

गुन्हे थोड्यात: 1) पनवेल तालुक्यातील दापोली पारगाव येथे आई व मुलीची धारदार चाकूने वार करत हत्या केली, सदर घटना लग्नास नकार दिल्याने आरोपीने रागाच्या भरात आज सकाळी हे कृत्य केले असून यावेळी सदर मुलीचे वडिलसुद्धा जखमी झाले आहेत. 2) निफाड तालुक्यात मंगळवारी कारसुळ येथील महाविद्यायीन युवतीचा मृतदेह आढळला होता. दीपिकाचा चुलतभाऊ विक्रम गोपीनाथ ताकाटे याने मित्राच्या मदतीने तिचा खून केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. दीपिका व विक्रम यांच्यातील अनैतिक संबंधातूनच हा खून झाला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. 3)आर्थिक राजधानी मुंबईतील अमली पदार्थांच्या दलालीविरुद्ध नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने कारवाई सुरू केली आहे. त्यानंतर आता 'हेरॉइन', या महागड्या अमली पदार्थांचीही मुंबईत तस्करी होत असल्याचे दिसून येत आहे. या अमली पदार्थांसह एका आफ्रिकन महिलेला अटक केली आहे. 4) बनावट नोटा छापणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने चेंबुर परिसरातून अटक केली आहे. कर्ज फेडण्यासाठी त्याने बनावट नोटा छापण्याचे काम सुरु केले होते. आरोपी फकीयानने यूट्यूबवरुन नोटा छापण्याचे प्रशिक्षण घेतले होते. 5)विरारमध्येही एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पतीनं एकावर थेट अ‍ॅसिड फेकल्यानं आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पत्नीसोबत एका जीम मालकाचे विवाहबाह्य संबंध असल्याचा पतीला दाट संशय होता. त्या संशयातूनच पतीनं हे कृत्य केल्याची माहिती समोर आलीय.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!