Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीय नौदलाच्या महाराष्ट्र क्षेत्राचे ध्वजाधिकारी म्हणून रिअर अ‍ॅडमिरल संदीप मेहता यांनी पदभार स्वीकारला.

December 17, 2021
in विशेष
0
Adm Sandeep Mehta takes over the charge as the FOMA

मुक्तपीठ टीम

भारतीय नौदलाच्या महाराष्ट्र क्षेत्राचे ध्वजाधिकारी म्हणून (फ्लॅग आॅफिसर कमांडिंग महाराष्ट्र नेव्हल एरिया-फोमा) रिअर अ‍ॅडमिरल संदीप मेहता यांनी गुरुवारी, १६ डिसेंबर रोजी येथे पदभार स्वीकारला. कुलाबा येथील ‘आयएनएस कुंजाली’ या हेलिकॉप्टर तळावर त्यांनी पदभार स्वीकारला. यावेळी त्यांना ‘गार्ड आॅफ आॅनर ’ सन्मान  देण्यात आला. यावेळी औपचारिक परेड करण्यात आली.
मेहता यांची कार्यकारी (एक्झिक्युटीव्ह) शाखेत १ जानेवारी १९८९ रोजी नियुक्ती झाली. ते खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी आणि महू येथील ‘आर्मी वॉर कॉलेज’ येथून पदवीधर झाले आहेत. ध्वजपदी पदोन्नती होण्यापूर्वी ते वॉशिंग्टन (डीसी) येथील भारतीय दूतावासात संरक्षण आणि नौदल ‘अ‍ॅटॅची’ म्हणून राजनैतिक नेमणुकीवर होते.

Adm Sandeep Mehta takes over the charge as the FOMAत्यांची शैक्षणिक पात्रता अत्युच्च आहे. ‘नॉटिकल सायन्स ’ आणि ‘ टॅक्टिकल आॅपरेशन्स’ मध्ये पदव्युत्तर पदवी, संरक्षण आणि धोरणात्मक अभ्यासातील ‘एम फिल’ पदवी आणि व्यवस्थापन अभ्यास यातही त्यांनी पदव्युत्तर पदविका मिळवली आहे.
विशिष्ट सेवा पदक प्राप्त केलेल्या मेहता यांच्या नौदल कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या मुख्यालयांमध्ये (कमांड ) नियुक्त्या झाल्या आहेत. किनारपट्टीवरील माइनस्वीपर, आयएनएस अलेप्पी, लँडिंग शिप टँक आयएनएस गुलदार आणि मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशिका आयएनएस दिल्ली यांचा समावेश आहे. त्यांनी सुकन्या आणि ज्योती नौैकांचे दिशादर्शन (नेव्हिगेटिंग) अधिकारी म्हणूनही काम केले आहे. त्यांच्या प्रारंभीच्या नेमणुकांमध्ये रणविजय, शार्दुल, चपळ आणि विभूती या भारतीय नौैकांवरील कार्यकाल आणि ‘आयएनएस किर्च’ या कॉर्व्हेटचे ‘कमिशनिंग’ कार्यकारी (एक्झिक्युटिव्ह) अधिकारी याचाही  समावेश आहे.

Adm Sandeep Mehta takes over the charge as the FOMA

त्यांच्या महत्त्वाच्या नियुक्त्यांमध्ये कमांड आॅपरेशन्स आॅफिसर, एनएव्हीसीसी येथे मुख्य कर्मचारी अधिकारी, अधिकारी अणि नौसैनिकांच्या विविध कारवाया केल्या जाणा-या नौदल संचालन संचालनालयातही सहसंचालक, दिल्लीतील नौदल मुख्यालयातील नौदल योजना संचालनालयात संचालक आणि मुख्य कर्मचारी अधिकारी (आॅपरेशन्स) यांचाही समावेश होतो.  नौदलाच्या पश्चिम मुख्यालयातंर्गत महाराष्ट्राचे ध्वजाधिकारी म्हणून सध्याची नेमणूक स्वीकारण्यापूर्वी ते वेलिंग्टन येथे संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालय (डीएसएससी) येथे मुख्य प्रशिक्षक (नौदल ) होते.


Tags: Indian NavyMaharashtraRear Admiral Sandeep Mehtaभारतीय नौदलमहाराष्ट्ररिअर अ‍ॅडमिरल संदीप मेहता
Previous Post

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०३१ अंतर्गत ३००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री

Next Post

“विद्यापीठाचे कुलगुरू युवा सेनेच्या किचन कॅबिनेटमध्ये ठरवणार?”

Next Post
"विद्यापीठाचे कुलगुरू युवा सेनेच्या किचन कॅबिनेटमध्ये ठरवणार?"

"विद्यापीठाचे कुलगुरू युवा सेनेच्या किचन कॅबिनेटमध्ये ठरवणार?"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!