Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईतील पायाभूत सुविधांचा विकास करताना यंत्रणांना जागतिक गुणवत्ता राखण्याची सूचना

'मुंबई इन ट्रान्झिट' कार्यशाळेत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचना

February 18, 2022
in घडलं-बिघडलं
0
Aditya Thackeray Suggestions at 'Mumbai in Transit' workshop

मुक्तपीठ टीम

सामान्य माणसाच्या जीवनमानात सुलभता यावी यासाठी एमएमआरडीए, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि इतर संबंधित यंत्रणांनी पायाभूत सुविधांचा विकास करताना जागतिक दर्जाची गुणवत्ता राखावी, अशा सूचना पर्यावरण व पर्यटनमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिल्या.

            

बृहन्मुंबई महानगरपालिका, सामान्य नागरिक, नियोजक, तज्ज्ञ, बेस्ट उपक्रम यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी तसेच मेट्रो प्रकल्प, पायाभूत सुविधांची माहिती आणि फायदे या विषयांवर चर्चा करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकारणातर्फे ‘मुंबई इन ट्रान्झिट‘ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन महानगर आयुक्त एस. व्ही.आर. श्रीनिवास यांच्या हस्ते झाले. पालकमंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, एम एम आर डी ए चे सहआयुक्त राहुल कर्डिले यांचेसह मान्यवर दूरदृश्यप्रणालीद्वारे यावेळी उपस्थित होते. 

            

मुंबईत विशेषतः पश्चिम उपनगरात होत असलेल्या सकारात्मक बदलांकडे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी लक्ष वेधले. एमएमआरडीए आणि इतर संबंधित यंत्रणांशी सकारात्मक बदलाबाबत सातत्याने संवाद साधला जाईल, जेणेकरून सामान्य मुंबईकरांच्या जीवनमानात गुणात्मक बदल घडेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

            

‘मुंबई इन ट्रान्झिट‘  या कार्यशाळेत मेट्रो लाईन २ ‘अ’ आणि ७ चा पश्चिम उपनगरांवर होणारा परिणाम, बहुवाहतूक एकात्मिकरण, अंतिम गंतव्यस्थान जोडणी, एकात्मिक तिकिटीकरण प्रणाली आदी विषयांवर सादरीकरण करण्यात येऊन चर्चा करण्यात आली.

            

मुंबई महानगर प्रदेशात वाहतूक व परिवहन व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मुंबई मेट्रो मार्गाचा सुमारे ३३७.१ किलोमीटरचा (१४ मार्गिका) बृहत आराखडा तयार केला आहे, त्याची नियोजनबद्ध पद्धतीने टप्प्या-टप्प्याने अंमलबजावणी सुरू आहे. सद्यस्थितीस मेट्रो बृहत आराखड्यामधील मेट्रो मार्ग-१ (वर्सोवा-अंधेरी- घाटकोपर) या ११.८० कि.मी. मेट्रो मार्ग कार्यान्वित आहे. मेट्रो २ ‘अ’ आणि ७ चे काम पुर्णत्वाकडे असून, लवकरच टप्प्या-टप्प्याने खुले करण्याचे नियोजन आहे. तसेच मेट्रो मार्ग २ ‘ब’ ४, ४ ‘अ’, ५, ६, ७अ आणि  ९ चे बांधकाम सुरु आहे.  मेट्रो मार्ग १०, ११, १२ ची प्रत्यक्ष अंमलबजावणीची कामे लवकरच सुरु होणे अपेक्षित आहेत. मेट्रो मार्ग ८, १३ व १४ चे नियोजन प्रगतिपथावर असल्याची माहिती यावेळी एमएमआरडीएच्यावतीने देण्यात आली.मेट्रो २ ‘अ’ आणि ७ लवकरच  खुली करण्याचे नियोजन असल्याने या मार्गिकांची माहिती मुंबईकरांना व्हावी या दृष्टीने प्रचार-प्रसिद्धी आणि जनजागृतीचे उपक्रम हाती घेण्याच्या दृष्टीने या कार्यशाळेत चर्चा करण्यात आली.


Tags: Aaditya ThackerayMMRDAआदित्य ठाकरेएमएमआरडीएबृहन्मुंबई महानगरपालिका
Previous Post

दिव्यांगांच्या विशेष शाळा-कार्यशाळा १ मार्चपासून सुरू होणार

Next Post

ठाणे – दिवा पाचव्या-सहाव्या रेल्वेमार्गाचं उद्घाटन

Next Post
Inauguration Ceremony of the 5th and the 6th new railway line between Thane and Diva Junction - LIVE

ठाणे - दिवा पाचव्या-सहाव्या रेल्वेमार्गाचं उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!