Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईतील विविध विकास प्रकल्पांच्या कामांचा मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा

December 16, 2021
in घडलं-बिघडलं
0
Aditya Thackeray reviews various projects in Mumbai

मुक्तपीठ टीम

मुंबईच्या विकासासाठी सुरू असलेले विविध पायाभूत सुविधा प्रकल्प दर्जेदार आणि कालबद्ध पद्धतीने पूर्ण व्हावेत, या अनुषंगाने पर्यावरण, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे या प्रकल्पांचा नियमित आढावा घेतात. आज त्यांनी दहिसर चेक नाका परिसरातील वाहतूक कोंडी सोडविणे, वरळी-शिवडी जोडरस्ता तसेच माहिम किल्ला परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास या कामांचा सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत आढावा घेतला.

            

पश्चिम एक्सप्रेस हायवेवर मुंबईतील प्रवेशद्वार असलेल्या दहिसर चेक नाका परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्याकरिता करावयाच्या उपाययोजनांसाठी मंत्री आदित्य ठाकरे सातत्याने प्रयत्नशील आहेत. आज त्यांनी एमएमआरडीए आणि वाहतूक पोलिसांसमवेत या कामांचा आढावा घेतला. येथे बहुतांश उपाययोजना अंमलात आणल्या गेल्या आहेत. मेट्रो ९ पियर आणि रिसरफेसिंगचे सध्या सुरू असलेले काम पुढील काही दिवसांमध्ये पूर्ण झाल्यानंतर निश्चितच येथील वाहतूक कोंडीचे प्रमाण कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

            

वरळी-शिवडी जोडरस्त्याच्या कामाच्या अनुषंगाने स्थानिक आमदार आणि नगरसेवकांनी नागरिक आणि प्रकल्पबाधितांच्या उपस्थित केलेल्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी मंत्री आदित्य ठाकरे यांनी संबंधितांना सूचना केल्या. हा प्रकल्प मध्य मुंबईतील वाहतुकीसाठी अतिशय महत्वाचा असून मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आणि कोस्टल रोड सोबतच पूर्ण होणे गरजेचे असल्याने कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

            

माहिम रेतीबंदर परिसराचा नुकताच पर्यटनदृष्ट्या कायापालट करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे माहिम किल्ल्याचाही विकास करण्यात येणार आहे. या अनुषंगानेही आज मंत्री आदित्य ठाकरे यांनी चर्चा केली.

            

या बैठकीस आमदार सर्वश्री सदा सरवणकर, अजय चौधरी, नगरसेवक श्रद्धा जाधव, उर्मिला पांचाळ, समाधान सरवणकर यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, एमएमआरडीएचे आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे, अपर पोलीस आयुक्त (वाहतूक) सत्यनारायण, महानगरपालिकेचे सहायक आयुक्त शरद उघडे आदी उपस्थित होते.


Previous Post

“मुळा धरण प्रकल्प कालव्याच्या विशेष दुरुस्ती तत्काळ हाती घ्या”

Next Post

शेतकरी हत्याकांडातील वादग्रस्त गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनीविरोधात आजही कारवाई नाही!

Next Post
lakhimpur

शेतकरी हत्याकांडातील वादग्रस्त गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनीविरोधात आजही कारवाई नाही!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!