Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईतील विकासकामांचा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंकडून आढावा

February 3, 2022
in सरकारी बातम्या
0
Aditya Thackeray

मुक्तपीठ टीम

मुंबईतील रहिवाश्यांच्या सोयी सुविधेसाठी सुरू असलेल्या विविध विकासकामांचा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आढावा घेतला. ही कामे दर्जेदार आणि नियोजित वेळेत पूर्ण व्हावीत, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

 

            

वरळी-शिवडी जोडरस्ता, नरिमन पॉईंट-कफ परेड जोडरस्ता, पश्चिम द्रुतगती महामार्ग, अंधेरी-घाटकोपर लिंक रोड, कलानगर जंक्शन आदी ठिकाणी सुरू असलेल्या कामांचा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी आढावा घेऊन सद्यस्थिती जाणून घेतली. तसेच संबंधित यंत्रणांना आवश्यक निर्देश दिले.

 

             

बैठकीस आमदार सदा सरवणकर, रवींद्र वायकर, अजय चौधरी, सुनील शिंदे, स्थानिक नगरसेवक सचिन पडवळ, समाधान सरवणकर, श्रद्धा जाधव, रोहिणी कांबळे, एमएमआरडीएचे आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासु, महानगरपालिकेचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांच्यासह स्थानिक रहिवासी उपस्थित होते.

            

 

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, वरळी-शिवडी जोडरस्त्याच्या कामामुळे बाधित रहिवाश्यांचे योग्य स्थलांतर करण्यात यावे, पायाभूत आणि नागरी सोयी सुविधांना बाधा पोहोचल्यास त्या तात्काळ दुरूस्त करण्यात याव्यात, काम सुरू होण्यास विलंब असेल त्याठिकाणी बॅरिकेट्स लावू नयेत. नरिमन पॉईंट-कफ परेड प्रस्तावित जोड रस्त्यामुळे बधवार पार्क कोळीवाड्यातील रहिवाश्यांच्या बोटींच्या वाहतुकीस बाधा येणार नाही यासाठी त्यांच्या गरजा आणि अडचणी समजून घेण्याच्या सूचनाही आदित्य ठाकरे यांनी केल्या.

            

 

पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उपाययोजना, नागरी सोयीसुविधा, जेथे शक्य आहे तेथे नागरी वने विकसित करणे, अंधेरी-घाटकोपर लिंक रोड तसेच उड्डाणपुलांच्या खालील मोकळ्या जागेत सुशोभीकरण आणि नागरी सुविधा, कलानगर जंक्शन आणि स्थानिक रहिवासी संस्थांच्या परिसरात नागरी सुविधा तसेच वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक बेट तयार करून ते सुशोभित करणे, जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून करावयाची सौंदर्यीकरणाची कामे आदींसंदर्भातही आदित्य ठाकरे यांनी आढावा घेऊन योग्य नियोजनाबाबत निर्देश दिले.


Tags: aditya thackeraymumbaiआदित्य ठाकरेमुंबईसदा सरवणकर
Previous Post

केंद्रीय अर्थसंकल्प अनारोग्यकारी! आरोग्य बजेट खुरटलेले, कोरोनासाठी निधीचा खडखडाट!

Next Post

लिंगचाचणी प्रकरणांमध्ये दोषसिद्धीचे प्रमाण वाढणे आवश्यक

Next Post
rajesh tope

लिंगचाचणी प्रकरणांमध्ये दोषसिद्धीचे प्रमाण वाढणे आवश्यक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!