मुक्तपीठ टीम
राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यासाठी शिवसेना नेते संजय राऊत आणि राज्यातून हजारो शिवसैनिक अयोध्येत दाखल झाले आहेत. शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. प्रथम आदित्य ठाकरे यांनी इस्कॉन मंदिराला भेट दिली. या ठिकाणी त्यांनी प्रभू श्रीकृष्णाचे दर्शन घेतले. त्याशिवाय इस्कॉन मंदिरातील प्रमुखांशीदेखील त्यांनी चर्चा केली.
असा आहे आदित्य ठाकरेंचा कार्यक्रम!
- आदित्य ठाकरे यांचे लखनौच्या चौधरी चरणसिंग विमानतळावर सकाळी ११.०० वाजता आगमन होणार आहे.
- दुपारी दीड वाजता ते अयोध्येतील हॉटेल पंचशील येथे पोहोचतील.
- दुपारी साडेतीन वाजता पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.
- दुपारी ४.४५ वाजता शहरातील रामनगर परिसरात असलेल्या इस्कॉन मंदिरात पूजा केली जाईल.
- सायंकाळी साडेपाच वाजता प्रभू श्रीरामाचे दर्शन घेणार. सायंकाळी ६.३० वाजता आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आरती व दुधाचा अभिषेक होईल.
- त्यानंतर ते लखनऊसाठी रवाना होतील.
आदित्य ठाकरेंनी घेतली पत्रकार परिषद!
- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी इस्कॉन मंदिराला भेट दिली आहे. या ठिकाणी त्यांनी प्रभू श्रीकृष्णाचे दर्शन घेतले. त्याशिवाय इस्कॉन मंदिरातील प्रमुखांशीदेखील त्यांनी चर्चा केली.
- यानंतर आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली.
- अयोध्येत महाराष्ट्र सदनसाठी जागा देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत पत्र व्यवहार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
- जनतेला दिलेली वचनं पाळणं हे शिवसेनेचं हिंदुत्त्व, मुंबईत रामाच्या आशीर्वादाने रामराज्य येईल, असेही ते म्हणाले.