Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अफवांवर किंवा बदनामीच्या गोष्टींवर आदित्य ठाकरेंनी बोलणं टाळलं, नाणारवर मात्र बोलले!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Aditya Thackeray (2)

मुक्तपीठ टीम

राज्याचे पर्यावरण आदित्य ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.यशवंत जाधवांच्या डायरीतील मातोश्री उल्लेखावर प्रश्न विचारला. त्यावेळी आदित्य ठाकरेंनी आपली प्रतिक्रिया दिली. अफवांच्या बातम्या केल्या जातात, अफवांवर किती लक्ष द्यायचं? असं म्हणत त्यांनी यावर काहीही बोलणार नाही, असं सांगितले. त्याचवेळी राजापूरातील स्थानिकांसाठी तसेच स्थानिक शिवसेना नेत्यांच्या राजकीय भविष्यासाठी महत्वाचा मुद्दा असणाऱ्या नाणार रिफायनरीवर मात्र ते बोलले.

अफवांवर किंवा बदनामीच्या गोष्टींवर मी बोलणार नाही…

  • अफवांवर किती बोलायचं आणि अधिकृत गोष्टींवर किती बोलायचं हे महत्त्वाचं आहे.
  • आताच्या काळात अफवा किती पसरविल्या जात आहेत हे तुम्हीही पाहत आहात.
  • इतरांकडून फिडिंग येतं आणि त्या अफवांच्या बातम्या होतात.
  • त्या खोलात मी जाणार नाही.
  • ज्या अधिकृत गोष्टी आहेत त्या बाहेर येतीलच.
  • पण अफवांवर किंवा बदनामीच्या गोष्टींवर मी बोलणार नाही.

 

हा धोकादायक प्रकार आहे महाराष्ट्रासाठी…

  • राजकीय षडयंत्र चाललं आहे.
  • ज्या ठिकाणी भाजपाचं सरकार नाही तिथे या गोष्टी सुरू आहेत.
  • या गोष्टीला कुठेही न घाबरता बिनधास्तपणे सामोरे जावं लागणार आहे.
  • टक्कर द्यायला महाराष्ट्र सज्ज आहे.
  • ज्या ज्या ठिकाणी यंत्रणा मागे लागल्या तिथे हे लोक तोंडावर पडत आहेत.
  • राजकारण एका ठिकाणी, पण जे घाणेरडं राजकारण सुरू आहे, बदनामी सुरू आहे, अफवा सुरू आहे, यंत्रणाचा गैरवापर होत आहे हे कुठे तरी थांबलं पाहिजे.
  • ही देशाची संस्कृती नाही.
  • घाणेरड्या राजकारणाचा प्रकार थांबला पाहिजे.
  • सत्तेतून बाहेर गेल्याचं जे नैराश्य येतं त्यातून विंडिक्टीव्ह पॉलिटिक्स सुरू आहे.
  • हा धोकादायक प्रकार आहे महाराष्ट्रासाठी.

 

नेत्यांमधली नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरु आहे…

  • तानाजी सावंत यांनी निधी वाटपावर नाराजी व्यक्त केली आहे.
  • त्यावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी, ज्या ठिकाणी दोन पक्ष एकमेकांच्या विरोधात लढलेले असतात त्या ठिकाणी खदखद होते.
  • पण ते सोडवण्याचा आमचा प्रयत्न सुरू असतो.
  • राजकारणात असं थोडं पुढे मागे होत असतं.
  • आम्ही महाराष्ट्रासाठी एकत्रं आलो आहोत.
  • त्यादृष्टीने आम्ही काम करत आहोत.
  • सर्व खासदार आमदारांशी चर्चा केली तर सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.
  • प्रत्येक मतदारसंघाला न्याय दिला आहे.
  • एक दोन लोकांना अधिकचं जास्त मिळतं, काहींना कमी मिळालं असेल तर त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

 

नाणारमधील रिफायनरी प्रकल्पाचं काय?

  • नाणारमध्ये रिफायनरीचा प्रस्ताव केंद्राने मांडला होता.
  • पण तेथे लोकवस्ती असल्याने नाणारमधून तो बाहेर हलवला.
  • चांगला मोठा प्रकल्प येत असेल तर तेथील स्थानिकांसोबत, भुमीपुत्रांसोबत चर्चा करुन त्यांचे हक्क कसे अबाधित राहतील हे पाहणं सरकारची प्राथमिकता आहे.
  • स्थानिकांचा विश्वास संपादित करुन पुढं जायचं आहे.
  • विश्वासावर पाय देऊन सरकार पुढे जाणार नाही.
  • दोन्ही बाजूंच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करुन त्यांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांपुढे मांडेन.

Tags: aditya thackeraynanar projectYashwant Jadhav
Previous Post

शासकीय विभागांकडून दर्जेदार विकासकामे व्हावीत – उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post

भारतीय शेतीवर ‘हे’ नवं संकट! जाणून घ्या मातीतील सेंद्रिय कार्बनचे प्रमाण घटण्याचे तोटे…कसं वाढवायचं?

Next Post
Farm

भारतीय शेतीवर 'हे' नवं संकट! जाणून घ्या मातीतील सेंद्रिय कार्बनचे प्रमाण घटण्याचे तोटे...कसं वाढवायचं?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!