Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“पर्यायी इंधनावरील वाहनांच्या क्षेत्रात पुणे नेतृत्व करेल” – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

पहिल्या पुणे पर्यायी इंधन परिषदेचे उद्घाटन

April 3, 2022
in घडलं-बिघडलं, निसर्ग, सरकारी बातम्या
0
Aditya Thackeray

मुक्तपीठ टीम

पुणे परिसरात पर्यायी इंधनावर चालणाऱ्या वाहनांचे उत्पादन करणाऱ्या आणि या क्षेत्राशी संबंधित विविध उद्योग येत असून भविष्यात पुणे या क्षेत्राचे नेतृत्व करेल आणि इतरांना पुण्याचे अनुकरण करावे लागेल, असा विश्वास पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

नवीन कृषि मैदान येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रायोजित आणि महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चर पुणेच्या सहयोगाने आयोजित पहिल्या पुणे पर्यायी इंधन परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री सचिवालयातील प्रधान सचिव आशिष कुमार सिंह, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अनबलगन, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील, पुणे महानगर विकास प्राधिकारणाचे सुहास दिवसे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे सदस्य सचिव अशोक शिनगारे, परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे, एमसीसीआयएचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत गिरबाने,  संचालक एस. एच. कोपर्डेकर आदी उपस्थित होते.

आदित्य ठाकरे म्हणाले, प्रदूषण मुक्ती, रोजगार उपलब्धता आणि पर्यायी इंधनाचा उपयोग वाढविण्यासाठी असे प्रयत्न महत्त्वाचे आहेत. पर्यायी इंधनावरील वाहनांमुळे महापालिकांच्या सार्वजनिक वाहतूक सेवेवरील खर्च कमी होताना दिसत आहे. त्यामुळे अशा वाहनांना प्रोत्साहन देण्याचे शासनाचे प्रयत्न आहे. येत्या २-३ वर्षात मोठ्या प्रमाणात चार्जिंग स्टेशन उभे राहतील. नव्याने या क्षेत्रात उद्योग करु इच्छिणाऱ्यांना उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन देणेही गरजेचे असून शासन त्यासाठी निश्चितपणे सकारात्मक भूमिका अदा करेल, असे त्यांनी सांगितले. पर्यावरण बदल परिषदेच्या माध्यमातून विविध विभागांच्या समन्वयाने शेतकऱ्यांसाठीदेखील उपयुक्त तंत्रज्ञान व साधने विकसीत व्हावीत यासाठी प्रयत्न करण्यात येतील असेही ते म्हणाले.

पुण्यात पर्यायी इंधनाच्या क्षेत्रात चांगले काम होत असल्याचे नमूद करून पर्यावरणमंत्री ठाकरे म्हणाले, परिषदेच्या माध्यमातून बायोइंधन आणि हायड्रोइंधनावरील सर्व वाहन उत्पादक संस्थांनी परिषदेत सहभाग घेतला आहे. इलेक्ट्रीक वाहनांचे सर्व पर्याय येथे उपलब्ध आहेत. काही स्टार्ट अप्सनीदेखील सहभाग नोंदविला आहे. बाहेरील उद्योगांसाठी महाराष्ट्र औद्यागिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सुविधा देण्यात येत आहेत. त्यामुळे राज्यातील जनतेला एकाच ठिकाणी पर्यायी इंधनावरील वाहनांचे चांगले पर्याय उपलब्ध होणार असून नव्या वर्षाच्या मुहुर्तावर ही चांगली सुरूवात असल्याचे त्यांनी सांगितले. बाहेरील उद्योगांच्या प्रतिनिधींनी आणि नागरिकांनी प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

उद्घाटनानंतर आदित्य ठाकरे यांनी प्रदर्शनाला भेट देऊन पर्यायी इंधनावरील वाहने व तंत्रज्ञानाची माहिती घेतली. त्यांच्या हस्ते ८ नव्या उत्पादनांचे उद्घाटन करण्यात आले, त्यापैकी २ स्टार्ट अप्स आहेत. प्रादेशिक परिहवन विभागातर्फे वाहन खरेदी करणाऱ्याला दोन दिवसात नोंदणी करून देण्याची सुविधा याठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे.


Tags: aditya thackeraypuneइंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चरपर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेपुणेपुणे पर्यायी इंधन परिषदमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळमहाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्समहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
Previous Post

“पर्यावरणाचा समतोल ठेवून मुंबईचा विकास करणार” – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post

ऊसतोड मजुरांना आता सामाजिक सुरक्षेचे कवच!

Next Post
Ustod Kamgar

ऊसतोड मजुरांना आता सामाजिक सुरक्षेचे कवच!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!