मुक्तपीठ टीम
या कोरोना काळात संपूर्ण हिंदी सिनेसृष्टीतील रोजंदरीवर काम करणाऱ्या कामगारांना यशराज फिल्म्स म्हणजे वायआरएफ फिल्म्सच्या आदित्य चोप्रा यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांनी यश चोप्रा फाऊंडेशनच्या वतीने बॉलिवूडमधील ३० हजार रोजंदार कामगारांच्या लसीकरणाचा संपूर्ण खर्च उचलण्याची तयारी दर्शविली आहे. फाउंडेशनने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून विनंती केली आहे की, “एकतर त्यांना लस खरेदी करण्याची परवानगी द्यावी अन्यथा ही लस देण्यात यावी.”
फाउंडेशनने म्हटले आहे की, “त्यांची फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजचे (FWICE) च्या माध्यमातून इतर ही सर्व संघटनाच्या सदस्यांचे लसीकरण करण्याची इच्छा आहे. ते लसींच्या वाहतुकीपासून सर्व लॉजिस्टिकचा खर्च उचलण्यासही तयार आहेत”.
महाराष्ट्रात एप्रिलच्या तिसर्या आठवड्यापासून लॉकडाऊन लागू केला गेला आहे. त्यानंतर सरकारने १५ मेपर्यंत मुदतवाढ दिली. लॉकडाऊनमुळे सर्व चित्रपटांचे, मालिकांचे शूटिंग बंद झाले आहे. यामुळे सिनेमाच्या वेगवेगळ्या भागातील कामगार बेरोजगार झाले आहेत. बहुतेक लोकांना त्यांच्या रोजच्या कामासाठीच पैसे मिळतात.
एफडब्ल्यूआयसीइने यापूर्वी बायो बबलमध्ये शूटिंग सुरू करण्याची परवानगी मागितली आहे. त्यांनी असेही केले आहे की, जर शुटिंग सुरू झाले नाही तर या कर्मचार्यांना मदत पॅकेज देण्यात यावे. परंतु या मागण्यांना सरकारने प्रतिसाद दिला नाही.
फिल्म कामगारांचे नेते अशोक पंडित काय म्हणतात?
• आम्ही यश चोप्रा फाऊंडेशनची विनंती मुख्यमंत्र्यांकडे पाठविली आहे.
• आम्ही असोसिएशनमध्ये नोंदणीकृत ३०,००० कर्मचार्यांच्या लसीकरणाचा खर्च यश चोप्रा फाउंडेशन उचलेल, हे कळवले आहे.
• यामुळे राज्य सरकारवर कोणताही आर्थिक भार येणार नाही.
• ज्या केंद्रात लसीकरण होईल तेथे एफडब्ल्यूआयसीइचे संघ सदस्य आणि फाउंडेशनचे लोक सरकारला सहकार्य करतील.
• एकदा जर फिल्म इंडस्ट्रीचा कणा म्हटले जाणाऱ्या या कामगारांना लस देण्यात आल्या तर, हे लोक कसलीही भीती न बाळगता शूटिंग करण्यासाठी परत येऊ शकतील.
• फिल्म इंडस्ट्रीचे काम सुरु होईल आणि त्यांचे रोजचे उत्पन्न पुन्हा मिळू लागेल.