Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

धमकी कोणी दिली याचा खुलासा अदर पुनावाला यांनी करावा !: नाना पटोले

पुनावालांनी देशहितासाठी लवकर मायदेशी येऊन लस उत्पादन वाढवावे

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
MPCC PC photo 2

मुक्तपीठ टीम

कोरोना प्रतिबंधक लस उत्पादन करणाऱ्या पुण्यातील सीरम इंन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांना धमकावण्यात आल्याचे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. पुनावाला यांनी स्वतःच लंडनमध्ये एका मुलाखतीत महत्वाच्या राजकीय व्यक्तीने धमकावल्याची माहिती दिली असून त्यांना धमकी देणारा राजकीय व्यक्ती कोण आहे, याचा खुलासा पुनावाला यांनी करावा. पुनावाला यांनी देशहितासाठी लंडनमधून लवकरात लवकर भारतात येऊन लसींचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करावे आणि भारताची लसीची गरज भागवावी. गरज पडल्यास पुनावाला यांना राज्य सरकार व काँग्रेस सुरक्षा पुरवेल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, अदर पुनावाला यांनी राज्य वा केंद्र सरकारकडे सुरक्षा मागितलेली नसताना केंद्र सरकारने त्यांना वाय दर्जाची सुरक्षा पुरवलेली आहे. एखाद्या व्यक्तीला सुरक्षा पुरवायची असेल तर त्यांच्या जीवाला धोका आहे हे तपासून आणि संबंधित व्यक्तीने अर्ज केल्यानंतर त्यांना सुरक्षा पुरवली जाते पण केंद्र सरकारने न मागताच पुनावाला यांना सुरक्षा दिली, यामागे काय राजकारण आहे? पुनावाला यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी सुरक्षा पुरवली आहे काय ? याचा खुलासा पुनावाला व केंद्र सरकारने करावा.

कोरोनावर मात करायची असेल तर सद्यस्थितीत लसीकरण हाच पर्याय आहे आणि जगभरातून तोच पर्याय वापरला जात आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी यांनीही वारंवार देशभर लसीकरणाची व्यापक मोहिम राबविली जावी हीच भूमिका मांडली आहे आणि सुप्रीम कोर्टानेही लसीकरणाचे महत्व ओळखून मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यासंदर्भात केंद्र सरकारला सुचना केलेल्या आहेत. काँग्रेस पक्षाच्या भूमिकेला सुप्रीम कोर्टाने दुजोराच दिलेला आहे. लसीकरण न झाल्याने कोरोना मृत्यू वाढत आहेत. पण केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे तसेच नियोजनशून्य कारभारामुळे लसीकरण करण्यात अडचणीत येत आहेत. लसींच्या किमतीही समान असायला हव्या होत्या पण एकाच लसीच्या तीन वेगवेगळ्या किमती कशा काय, हे एक मोठे गुपित आहे, यात कमीशनचा मुद्दा तर नाही ना, अशी शंका घेण्यास जागा आहे.

MPCC PC photo 1

केंद्राला कोरोनाची स्थिती हाताळता आलेली नाही. त्यांच्या चुकांमळे मृत्यू होत आहेत. देशात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना केंद्र सरकारने रेमडेसिवीर व लसींची निर्यात का केली. रेमडेसिविर जर खुल्या बाजारात आणले असते तर त्याचा काळाबाजार झाला नसता. महाराष्ट्राला ३० एप्रिलपर्यत ४.३८ लाख रेमडेसीवीर देण्याचे केंद्र सरकारने मान्य केले पण फक्त २.५० लाख रेमडेसीवीरच दिले. राज्यात परिस्थिती बिघडली आणि काळा बाजार वाढला रुग्णांच्या परिवाराचे खिसे कापले जात आहेत. या गोंधळास सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.


Tags: Adar Poonawallacoronaremdesivir injectionserum-instituteअदर पुनावालाकोरोनानाना पटोलेरेमडेसिविरसीरम इन्स्टिट्यूट
Previous Post

आज नवे रुग्ण ५० हजाराखाली, ५९ हजार बरे झाले! मुंबईत ३ हजाराखाली!

Next Post

#व्हाअभिव्यक्त! उन्हाळी सुट्टीत शिक्षक, विद्यार्थ्यांना काम करायला लावणाऱ्या मुख्याध्यापक, प्राचार्यांवर कारवाई करा!

Next Post
varsha gaikwad

#व्हाअभिव्यक्त! उन्हाळी सुट्टीत शिक्षक, विद्यार्थ्यांना काम करायला लावणाऱ्या मुख्याध्यापक, प्राचार्यांवर कारवाई करा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!