Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता समभागांसाठी ओपन ऑफर! नव्या वर्षाआधीच एनडीटीव्हीचा रिमोट कंट्रोल अदानींच्या हाती?

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Adani Group-NDTV

मुक्तपीठ टीम

अदानी समुहातील मीडिया कंपनी एनडीटीव्हीमध्ये अतिरिक्त २६ टक्के स्टेक घेण्यासाठी १७ ऑक्टोबर रोजी ओपन ऑफर देणार आहे. या ऑफरचे व्यवस्थापन करणाऱ्या जेएम फायनानशियलने जारी केलेल्या जाहिरातीनुसार, ही ऑफर ०१ नोव्हेंबर रोजी बंद होईल. ओपन ऑफर अंतर्गत, अदानी समूह एनडीटीव्हीचे १ कोटी ६७ लाख इक्विटी शेअर्स घेणार आहे. यासाठी शेअरची किंमत २९४ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे. जर ऑफर पूर्णपणे सबस्क्राइब झाली तर त्याचे एकूण मूल्य २९४ रुपये प्रति शेअर म्हणजे ४९२.८१ कोटी रुपये होईल. त्यामुळे चालू वर्षाच्या अखेरीस एनडीटीव्हीचा रिमोट कंट्रोल अदानींच्या हाती येण्याची शक्यता आहे.

एनडीटीव्हीचा रिमोट कंट्रोल हाती घेण्यासाठी अदानी समुहाची आक्रमक चाल…

  • अदानी समूहाने २३ ऑगस्ट रोजी विश्वप्रधान कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेडच्या ​​अधिग्रहणाद्वारे एनडीटीव्हीमधील २९.१८ टक्के हिस्सेदारी खरेदी करण्याची घोषणा केली.
  • आरआरपीआर होल्डिंगमध्ये व्हीसीपीएलची ९९.९९ टक्के हिस्सेदारी आहे. अदानी समूहाच्या कंपन्यांनी व्हीसीपीएल, एएमजी मीडिया नेटवर्क्स आणि अदानी एंटरप्रायझेस – एनडीटीव्हीमध्ये अतिरिक्त २६ टक्के स्टेक म्हणजेच १.६७ कोटी इक्विटी शेअर्स विकत घेण्याचा प्रस्ताव ठेवला होता.
  • आता अदानी समुहातील मीडिया कंपनी एनडीटीव्हीमध्ये अतिरिक्त २६ टक्के स्टेक घेण्यासाठी १७ ऑक्टोबर रोजी ओपन ऑफर देणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

सेबीचा अडथळा हटणार?

  • या घोषणेच्या काही दिवसांनंतर, एनडीटीव्हीचे प्रणव आणि राधिका रॉय यांनी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीच्या मंजुरीशिवाय हा करार पुढे जाऊ शकत नाही, याची माहिती दिली होती.
  • सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने २७ नोव्हेंबर २०२० रोजी केलेल्या आदेशाद्वारे एनडीटीव्हीचे संस्थापक राधिका रॉय आणि प्रणय रॉय यांना सिक्युरिटी मार्केटमध्ये दोन वर्षांसाठी व्यापार करण्यास बंदी घातली आहे.
  • स्थगितीचा हा कालावधी २६ नोव्हेंबर रोजी संपेल.
  • तोपर्यंत अदानी समुहाच्या इतर प्रक्रिया झालेल्या असतील किंवा त्याआधीच सेबीबंदीतून मार्गही काढला जाण्याची शक्यता आहे.
  • त्यामुळे अदानी ग्रुपने ठरवल्याप्रमाणे एनडीटीव्हीचा रिमोट कंट्रोल नव्या वर्षाआधीच थेट अदानींच्या हाती येण्याची शक्यता आहे.

Tags: adani groupMedia Company NDTVmuktpeethअदानी समुहघडलं-बिघडलंमीडिया कंपनी एनडीटीव्हीमुक्तपीठ
Previous Post

‘उत्कृष्ट गणेशोत्सव’ स्पर्धेसाठी मंडळांना २ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

Next Post

तथाकथीत जी-२३ नेत्यांची कटकारस्थाने मोदी-शहांच्या इशाऱ्यावर! : नाना पटोले

Next Post
Nana Patole Modi And Gulam Nabi Azad

तथाकथीत जी-२३ नेत्यांची कटकारस्थाने मोदी-शहांच्या इशाऱ्यावर! : नाना पटोले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!