मुक्तपीठ टीम
अदानी समुहातील मीडिया कंपनी एनडीटीव्हीमध्ये अतिरिक्त २६ टक्के स्टेक घेण्यासाठी १७ ऑक्टोबर रोजी ओपन ऑफर देणार आहे. या ऑफरचे व्यवस्थापन करणाऱ्या जेएम फायनानशियलने जारी केलेल्या जाहिरातीनुसार, ही ऑफर ०१ नोव्हेंबर रोजी बंद होईल. ओपन ऑफर अंतर्गत, अदानी समूह एनडीटीव्हीचे १ कोटी ६७ लाख इक्विटी शेअर्स घेणार आहे. यासाठी शेअरची किंमत २९४ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे. जर ऑफर पूर्णपणे सबस्क्राइब झाली तर त्याचे एकूण मूल्य २९४ रुपये प्रति शेअर म्हणजे ४९२.८१ कोटी रुपये होईल. त्यामुळे चालू वर्षाच्या अखेरीस एनडीटीव्हीचा रिमोट कंट्रोल अदानींच्या हाती येण्याची शक्यता आहे.
एनडीटीव्हीचा रिमोट कंट्रोल हाती घेण्यासाठी अदानी समुहाची आक्रमक चाल…
- अदानी समूहाने २३ ऑगस्ट रोजी विश्वप्रधान कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेडच्या अधिग्रहणाद्वारे एनडीटीव्हीमधील २९.१८ टक्के हिस्सेदारी खरेदी करण्याची घोषणा केली.
- आरआरपीआर होल्डिंगमध्ये व्हीसीपीएलची ९९.९९ टक्के हिस्सेदारी आहे. अदानी समूहाच्या कंपन्यांनी व्हीसीपीएल, एएमजी मीडिया नेटवर्क्स आणि अदानी एंटरप्रायझेस – एनडीटीव्हीमध्ये अतिरिक्त २६ टक्के स्टेक म्हणजेच १.६७ कोटी इक्विटी शेअर्स विकत घेण्याचा प्रस्ताव ठेवला होता.
- आता अदानी समुहातील मीडिया कंपनी एनडीटीव्हीमध्ये अतिरिक्त २६ टक्के स्टेक घेण्यासाठी १७ ऑक्टोबर रोजी ओपन ऑफर देणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
सेबीचा अडथळा हटणार?
- या घोषणेच्या काही दिवसांनंतर, एनडीटीव्हीचे प्रणव आणि राधिका रॉय यांनी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीच्या मंजुरीशिवाय हा करार पुढे जाऊ शकत नाही, याची माहिती दिली होती.
- सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने २७ नोव्हेंबर २०२० रोजी केलेल्या आदेशाद्वारे एनडीटीव्हीचे संस्थापक राधिका रॉय आणि प्रणय रॉय यांना सिक्युरिटी मार्केटमध्ये दोन वर्षांसाठी व्यापार करण्यास बंदी घातली आहे.
- स्थगितीचा हा कालावधी २६ नोव्हेंबर रोजी संपेल.
- तोपर्यंत अदानी समुहाच्या इतर प्रक्रिया झालेल्या असतील किंवा त्याआधीच सेबीबंदीतून मार्गही काढला जाण्याची शक्यता आहे.
- त्यामुळे अदानी ग्रुपने ठरवल्याप्रमाणे एनडीटीव्हीचा रिमोट कंट्रोल नव्या वर्षाआधीच थेट अदानींच्या हाती येण्याची शक्यता आहे.