मुक्तपीठ टीम
पॉर्नतापामुळे गुन्हा दाखल झालेला राज कुंद्राच्या अडचणीत नव्याने वाढ होत आहे. राज कुंद्राला क्लिन चीट देणारी अभिनेत्री गहना वशिष्ठ आणि राज कुंद्राच्या कंपनीतील तीन निर्मात्यांविरुद्ध मुंबईतील मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हॉटशॉट आणि इतर अॅप्सवर अश्लील फोटो, व्हिडीओ चित्रीत करून अपलोड केल्याचा आरोप या चौघांवर करण्यात आला आहे.
सांगितले ‘सिंगल मदर’, दिला ‘कामवाली’ बोल्डपट!
- अभिनेत्री आणि राजच्या चित्रपटात अभिनय केलेल्या अभिनेत्रीने या चौघांविरुद्ध मालवणी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली आहे.
- २०१८ रोजी रोनक नावाच्या कास्टिंग एजंटमार्फत तिला अभिनयाची संधी मिळाली.
- ४ फेब्रुवारी २०१८ रोजी तिला मालाड मढमधील बंगल्यात अभिनयासाठी ‘सिंगल मदर’ नावाची संहिता देण्यात आली.
- सिंगल मदरसाठी योग्य पात्र ठरत नसल्यामुळे तिला कामवाली या चित्रपटात अभिनय करण्यास सांगितले.
- परंतु त्या अभिनयात बोल्ड सीन असल्यामुले तीने अभिनय करण्यास नकार दिला.
व्हिडीओ चित्रित करून पुरावा तयार करण्याची सक्ती
- त्यानंतर तीला ‘शनाया’ नावाचा व्हिडीओ चित्रीत करण्यास सांगितला.
- ‘हाय मेरा नाम शनाया है| मैने हॉट हिट चॅनल पर बोल्ड सीरीज की है| मेरा लुक देखने के लिए हॉट हिट चॅनल को डाउनलोड, लाईक, और सब्सस्क्राईब करे| अगर यह व्हिडीओ कही भी रिलीज होती है तो मुझे कोई आपत्ती नही है|’ असे वाक्य तीच्याकडून व्हिडीओद्वारे चित्रीत करण्यात आले.
- हॉटशॉट एपसाठी पॉर्न शूट करण्यासाठी तिच्यावर बळजबरी करण्यात आली असल्याचे तिने सांगितले आहे.
- पॉन शूट करण्यास नकार दिल्यास केलेल्या करारानुसार एफआयआरची धमकी तिला देण्यात आली.