Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“मराठी भाषा विभागाचा तीन वर्षांचा कृती आराखडा तयार होणार”

January 20, 2022
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
Action plan for marathi language dept

मुक्तपीठ टीम

राज्य शासनाच्या भाषा विभागाने मागील दोन वर्षांत उल्लेखनीय काम करत विविध उपक्रम यशस्वीरित्या राबविले. यापुढे मराठी भाषा विभागाला दिशा देणारा पुढील तीन वर्षांचा ठोस कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे दिले.

            

मराठी भाषा विभागांतर्गत येत असलेल्या चार संस्थांच्या कामाचा आढावा व आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा मंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी विश्वकोष मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित, साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सदानंद मोरे, भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष प्रा.लक्ष्मीकांत देशमुख यांच्यासह भाषा विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, सहसचिव मिलिंद गवादे, मीनाक्षी पाटील, संजय पाटील, शमाकांत देवरे यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

            

मराठी भाषा धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सुधारित मसूदा तयार करणे, अभिजात मराठी भाषा जन अभियान मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी, मराठी बोलीभाषा संबंधी नवे उपक्रम आयोजित, मराठी ज्ञानभाषा होण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यावर चर्चा करण्यात आली. मराठी भाषा धोरण तयार असून ते लवकरच जाहीर करण्याची सूचना सदानंद मोरे यांनी मांडली. दरम्यान, काही सूचनांसह १५ फ्रेब्रुवारीपर्यंत हा अहवाल सादर करण्यात येईल, असे लक्ष्मीकांत देशमुख यांनी स्पष्ट केले. दरम्यान, २७ फेब्रुवारीपूर्वी मंत्रिमंडळाची प्रस्तावास मंजुरी घेण्यात यावी, असे नियोजन करण्याच्या सूचना सुभाष देसाई यांनी केल्या.

            

मराठीच्या संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक संस्था काम करतात. त्यासाठी आंतरराष्ट्रीय मंच तयार करण्यात आला आहे. भाषा विभागाने देश-विदेशातील मराठी संस्थांशी समन्वय ठेवण्यासाठी प्रणाली विकसित करण्याची सूचना यावेळी करण्यात आली.

            

मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी विभागाचा कारभार हाती घेतल्यानंतर विविध योजना पूर्ण केल्या आहेत. अनेक प्रलंबित विषय मार्गी लावले आहेत. मराठी भाषा विभागासाठी मरिन ड्राइव्ह परिसरात मोक्याचा भूखंड मिळाला. उपक्रेंद्राचा प्रश्न मार्गी लागला. अभिजात मराठीसाठी जनजागृती मोहिम राबविली जात आहे. पुस्तकांचे गाव योजनेचा विस्तार, मराठी पाट्यांची सक्ती, सर्व माध्यमांच्या शाळांमधून मराठी भाषा शिकविणे सक्तीचे आदी महत्वाचे निर्णय मागील दोन वर्षांत घेतल्याचे भूषण गगराणी यांनी सांगितले.

            

भाषा विभागांतर्गत असलेल्या चारही संस्थांनी आपल्या विभागाच्या बैठका घेऊन पुढील तीन वर्षांचा कार्यक्रम निश्चित करून भाषा विभागाचे कामकाज अधिक गतीमान करावे, असे सुभाष देसाई यांनी सांगितले.


Tags: MaharashtramarathiMarathi Languagesubhash desaiमंत्री सुभाष देसाईमराठीमराठी भाषा
Previous Post

सर्वसामान्य महिलापर्यंत माहिती पोहोचविण्यासाठी ‘शक्ती कायदा जागृती समिती’

Next Post

कॅबिनेट मंत्री नसलेल्या वनखात्याच्या कारभाराला गती देण्याचे राज्यमंत्री भरणेंचे प्रयत्न, रिक्त पदभरतीसंदर्भात निर्देश

Next Post
State Min Dattatray Bharane PWD Meeting 1

कॅबिनेट मंत्री नसलेल्या वनखात्याच्या कारभाराला गती देण्याचे राज्यमंत्री भरणेंचे प्रयत्न, रिक्त पदभरतीसंदर्भात निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!