Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

२०० कोटी रुपयांची आंतरराज्यीय खोटी बिले; सहा जेरबंद

महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवा कर विभागाची कारवाई

March 26, 2021
in कायदा-पोलीस
0
arrest

मुक्तपीठ टीम

वस्तू व सेवा कर कायद्यांतर्गत खरेदी करणाऱ्या नोंदणीकृत व्यापाऱ्यास खरेदीवर भरलेल्या वस्तू व सेवाकराची वजावट त्याला विक्रीवरील करदेयतेमधून मिळत असते. या सवलतीचा गैरफायदा घेण्याच्या उद्देशाने आरोपींनी खोट्या आणि बनावट दस्तऐवजांच्या आधारे वस्तू व सेवा कर कायद्याखाली नोंदणी दाखला प्राप्त करून प्रत्यक्षात कोणताही व्यवसाय न करता जवळपास दोनशे कोटी रुपयांची खोटी बिले देऊन शासनाची ३९ कोटी रुपयांची फसवणूक केली.

खोटी बिलं देऊन शासनाची करोडो रुपयांची महसूल हानी करणाऱ्या करदात्यांविरुद्ध महाराष्ट्र शासनाने हाती घेतलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत मे. ग्लान्स ट्रेडिंग, मे. फेडरॉक्स एन्टरप्राइसेस, मे. आर. के. ट्रेडिंग, मे. एडविन एन्टरप्राइसेस, मे. सायरस एन्टरप्राइसेस आणि मे. अल्फा एन्टरप्राइसेसचे प्रकरण पुढील तपासासाठी राज्यकर सहआयुक्त अन्वेषण-अ यांच्या कार्यालयात पाठविण्यात आले होते. या प्रकरणात २२ डिसेंबर २०२० रोजी अन्वेषण भेट देण्यात आली. तपासणीदरम्यान असे लक्षात आले की करदाता मे. ग्लान्स ट्रेडिंगचे मालक विलास केरू मोहिते, मे. फेडरॉक्स एन्टरप्राइसचे मालक राम शंकर तुपट, मे. आर. के. ट्रेडिंगचे मालक राजकुमार सियाराम भुल्लू सरोज, मे. एडविन एन्टरप्राइसेसचे मालक थीयागराजन गुरुस्वामी नायडू, मे. सायरस एन्टरप्राइसचे मालक सुरेंधर सुब्रमनियम देवेंदर आणि मे. अल्फा एन्टरप्राइसेसचे मालक हसन महम्मद हुसेन तांबोळी यांनी प्रत्यक्षात कोणताही व्यवसाय न करता एकूण १९० कोटी रुपयांची बिले तेलंगणा आणि इतर राज्यातील व्यापाऱ्यांना खोटी वजावट उपलब्ध करून दिली.

नोंदीत व्यवसायाच्या ठिकाणी या व्यक्ती कोणताही व्यवसाय करीत नसल्याचे आढळले किंवा काही व्यवसायाची नोंदणी बनावट कागदपत्रांच्या आधारे खोट्या पत्त्यावर घेतल्याचे आढळले.

या प्रकरणात मे. ग्लान्स ट्रेडिंगकडे कोणताही आय. टी. सी. उपलब्ध नसतांना त्यांनी मे. फेडरॉक्स एन्टरप्राइसला खोटी बिले वितरित केली आणि कोट्यवधी रुपयाची कर वजावट उपलब्ध करून दिली. यापुढे मे. फेडरॉक्स एन्टरप्राइसेसने मे. आर. के. ट्रेडिंग, मे. एडविन एन्टरप्राइसेस, मे. सायरस एन्टरप्राइस आणि मे. अल्फा एन्टरप्राइसेस यांना खोटी बिले देऊन कर वजावट स्थानांतरित केली व या चौघांनी आंतरराज्यीय व्यवहार दर्शवून इतर राज्यातील व्यापाऱ्यांना कोट्यवधी रुपयांची खोटी बिले देऊन वजावट उपलब्ध करून दिली.

सहाही प्रकरणामध्ये महाराष्ट्र वस्तू व सेवाकर अधिनियम, २०१७ च्या तरतुदीचे उल्लंघन करून वस्तूंच्या पुरवठ्याशिवाय १९० कोटी रुपयांचे बनावट बिले देऊन आणि ३९ कोटी रुपयाचा वस्तू व सेवाकर त्याच्या इतर राज्यातील प्राप्तकर्त्यांना स्थानांतरित केला असून ३९ कोटी रुपयांची बनावट वजावट मिळवुन दिली आहे. म्हणूनच सहा करदात्यांनी महाराष्ट्र वस्तू व सेवाकर अधिनियम, २०१७ च्या तरतूदीचे उल्लंघन करुन वस्तूंचा पुरवठा न करता बीजक किंवा बिल जारी करून शासनाची महसूल हानी केली आहे. विलास केरू मोहिते, राम शंकर तुपट, राजकुमार सियाराम भुल्लू सरोज, थीयागराजन गुरुस्वामी नायडू, सुरेंधर सुब्रमनियम देवेंदर आणि हसन महम्मद हुसेन तांबोळी यांना महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने २३ मार्च २०२१ रोजी अटक केली असून न्यायालयाने विलास केरू मोहिते, राम शंकर तुपट, थीयागराजन गुरुस्वामी नायडू, सुरेंधर सुब्रमनियम देवेंदर आणि हसन महम्मद हुसेन तांबोळी यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे तर राजकुमार सियाराम भुल्लू सरोज यांना करहानी ५ कोटी रुपयांपेक्षा कमी असल्याने वस्तू व सेवा कर कायद्यातील तरतुदींच्या अधीन राहून वैयक्तिक जामीन देण्यात आला.

वरील प्रकरणात आणखी काही लोकांचा सहभाग असण्याचा संशय महाराष्ट्र वस्तू व कर विभागाने व्यक्त केला आहे. याबाबत पूनम ओंबासे, सहायक आयुक्त, उत्तम बोधगिरे, सहायक आयुक्त, जनार्दन आटपाडकर, सहायक आयुक्त, नंदकुमार दिघे, सहायक आयुक्त, सुहास गावडे, सहायक आयुक्त, संजय म्हस्केपाटील, सहायक आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली पथक स्थापन करण्यात आले असून गजानन खानंदे, उप आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरु आहे. तपासासाठी रवीन्द्रन, भा. प्र. से., सहआयुक्त, अन्वेषण-अ यांचे विशेष मार्गदर्शन लाभत आहे.


Tags: MaharashtraMaharashtra State Goods and Services Tax Departmentमोठी कारवाईवस्तू व सेवा कर कायदा
Previous Post

रुग्णालय अग्निकांडप्रकरणी मनपा अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाच्या गु्न्ह्याची मागणी

Next Post

पर्ससीन नेट, एलईडीद्वारे मासेमारी रोखण्यासाठी लवकरच कडक कायदा

Next Post
parsasin net

पर्ससीन नेट, एलईडीद्वारे मासेमारी रोखण्यासाठी लवकरच कडक कायदा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!