Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कांडला बंदरातील १,४३९ किलो हेरॉईन! आरोपीला अखेर अटक!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
accused arrested in kandala 1,439kg heroin case

मुक्तपीठ टीम

गुजरातमधील कांडला बंदरात सापडलेल्या १,४३९ कोटींच्या हेरॉइन प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. हा आरोपी नोदंणीकृत आयातदार म्हणजे इंपोर्टर आहे. तो उत्तराखंडच्या पत्त्यावर सापडला नाही. अखेर तो पंजाबमधील एका गावात लपल्याची माहिती मिळाली. तेथून त्याला अटक कण्यारत आली आहे.

 

गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) अधिकाऱ्यांबरोबर संयुक्तपणे विकसित केलेल्या माहितीच्या आधारे, महसूल गुप्तवार्ता संचालनालयाचे (डीआरआय) अधिकारी सध्या कांडला बंदर इथे उत्तराखंड स्थित कंपनीने आयात केलेल्या मालाची तपासणी करत आहेत. इराणच्या अब्बास बंदरातून १० हजार ३१८ बॅगांची ही खेप कांडला बंदरात आली होती. सतरा कंटेनरमधून आयात केलेल्या मालाचे एकूण वजन २९४ मेट्रिक टन आहे आणि ती “जिप्सम पावडर” असल्याचे सांगितले होते.

 

आतापर्यंत १,४३९ कोटी रुपये किंमतीचे २०५.६ किलो अवैध हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. मालाची सखोल तपासणी अजूनही बंदरात सुरू आहे.

 

तपासादरम्यान, आयातदार उत्तराखंडमधील नोंदणीकृत पत्त्यावर सापडला नाही. त्यामुळे आयातदाराला पकडण्यासाठी देशभरात मोहीम सुरू करण्यात आली. आयातदाराचा ठावठिकाणा शोधण्यासाठी डीआरआयने भारतभर विविध ठिकाणी छापे टाकले. ओळख टाळण्यासाठी आयातदार सारखी ठिकाणे बदलत होता आणि लपत होता. मात्र अखेर सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आले आणि पंजाबमधील एका लहान गावात हा आयातदार सापडला. आयातदाराने प्रतिकार करून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी त्याला पकडले.

 

आतापर्यंत केलेल्या चौकशीच्या आधारे, डीआरआयने या आयातदाराला एनडीपीएस कायद्याच्या तरतुदींअंतर्गत अटक केली आणि त्याला २३ एप्रिल रोजी अमृतसरच्या विशेष दंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले . डीआरआय अधिकाऱ्यांना या आयातदाराला भुज येथील न्यायालयासमोर हजर करता यावे यासाठी न्यायालयाने ट्रान्झिट रिमांड मंजूर केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.


Tags: ATSDRIGujaratheroineKandala Caseकांडला बंदरगुजरातहेरॉईन
Previous Post

“पंतप्रधानांच्या निवासासमोर हनुमान चालिसा आणि कुराण पठण करु द्या!” राष्ट्रवादीच्या महिला नेत्याची मागणी

Next Post

ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी लांबणीवर…४ मे ला होणार पुढील सुनावणी

Next Post
supreme court 2

ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी लांबणीवर...४ मे ला होणार पुढील सुनावणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!