Tuesday, June 3, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भाजपाच्या माजी आमदारावर बेहिशेबी संपत्तीचा गुन्हा! उत्पन्नापेक्षा मालमत्ता जास्त कशी? पोलीस करणार तपास!

May 20, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
narendra Mehta

मुक्तपीठ टीम

केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांवरून राज्यात महाविकास आघाडी सरकार आणि भाजापमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. भाजपाच्या मदतीने केंद्रीय तपास यंत्रणांकडून आघाडीच्या काही नेत्यांवर कारवाई सुरू असल्याचा आरोप करण्यात येतो. दरम्यान राज्यातील एका भाजपा नेत्याविरोधात ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर त्यांच्या उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता जमवल्याचा आरोप आहे. या गुन्ह्यात त्यांची पत्नी सुमन मेहता यांना सहआरोपी करण्यात आले आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

  • नरेंद्र मेहता यांनी बेकायदेशीर मार्गाने संपत्ती जमा केली असल्याची तक्रार लोकायुक्तांकडे करण्यात आली होती.
  • त्यानंतर मेहता यांच्याविरोधात चौकशी सुरू करण्यात आली.
  • लोकसेवकपदाचा आणि अधिकाराचा दुरुपयोग करून त्यांनी उत्पन्नापेक्षा ८ कोटी २५ लाख ५१ हजार ७७३ रुपये एवढी अधिक मालमत्ता, संपत्ती जमा केली असल्याचा आरोप आहे.
  • त्याशिवाय, त्यांची पत्नी सुमन मेहता यांनी लोकसेवक नरेंद्र मेहता यांनी गैरमार्गाने जमवलेल्या केलेल्या मालमत्तेचा विनियोग करण्यास मदत केल्याचाही ठपका त्यांच्या पत्नीवर आरोप आहे.
  • याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तक्रारीवरून नरेंद्र मेहता आणि सुमन मेहता यांच्याविरोधात नवघर पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नवघऱ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार अधिनियम १९८८चे कलम १३ (१) (इ), १३(२) सह भादंवि संहिता कलम १०९ नुसार गुन्हा दाखल केला.
  • गुन्हा दाखल झाल्यानंतर गुरुवारी संध्याकाळनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मेहता यांचे घर आणि कार्यालयाची झडती घेतली.

कोण आहेत नरेंद्र मेहता?

  • मिरा-भाईंदर भागामध्ये नरेंद्र मेहता हे भाजपाचे महत्त्वाचे नेते आहेत.
  • मागील विधानसभा निवडणुकीत त्यांना बंडखोरीचा फटका बसल्याने थोडक्यात पराभव झाला होता.
  • माजी आमदार नरेंद्र मेहता १ जानेवारी २००६ ते ३१ ऑगस्ट २०१५ या कालावधीत मीरा भाईंदर महापालिकेचे नगरसेवक होते.
  • त्याशिवाय मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते.

Tags: BJPMVANarendra Mehtaठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागनरेंद्र मेहताभाजपामहाविकास आघाडी सरकार
Previous Post

महाराष्ट्राचे शिष्टमंडळ कान्स चित्रपट महोत्सवात सहभागी होणार

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आवाहन: “भाजपानं ठरवावं २५ वर्षांचं लक्ष्य!”

Next Post
PM modi (5)

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आवाहन: "भाजपानं ठरवावं २५ वर्षांचं लक्ष्य!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!