Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीय रेल्वेला AC-3 स्वस्त केल्यानंतर मोठा फायदा! इकॉनॉमी एसी कोचना मोठा प्रतिसाद!

September 5, 2026
in उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
Economy AC Coach

मुक्तपीठ टीम

एखादी सेवा स्वस्त केली की तोट्याच्या बोंबा नेहमीच ठोकल्या जातात. पण रेल्वेला मात्र AC-3 ला Economy AC अशा स्वस्त स्वरुपात लागू करणं मोठा फायदा मिळवून देणारं ठरलं आहे. नवीन ‘इकॉनॉमी’ एसी-३ कोचमधून रेल्वेला पहिल्या वर्षात २३१ कोटी रुपयांची कमाई झाली आहे.

आकडेवारीवरून असे दिसून येते की, हे डबे सुरू झाल्यापासून, सामान्य एसी-३ श्रेणीतील कमाईवर कोणताही परिणाम झालेला नाही. ‘इकॉनॉमी’ एसी-३ कोच ही तुलनेनं स्वस्त एसी रेल्वे प्रवास सेवा आहे. स्लीपर क्लासच्या प्रवाशांना ‘सर्वोत्तम आणि स्वस्त एसी प्रवास’ सेवा देण्यासाठी ही सेवा सुरू करण्यात आली होती.

या डब्यांचे भाडे सामान्य एसी-३ सेवेपेक्षा ६ ते ७ टक्के कमी आहे. एसी-३ टियर इकॉनॉमी क्लासमध्ये २१ लाखांहून अधिक लोकांनी प्रवास केला, यादरम्यान, रेल्वेने २३१ कोटी रुपये कमावले. हे डबे सुरू करणे रेल्वेसाठी अवघड होते, कारण भाडे जास्त नसल्याची खात्री करणे आवश्यक होते.

लाखो भारतीय रेल्वे प्रवाशांनी इकॉनॉमी एसी कोच सुविधेचा घेतला लाभ…

  • एप्रिल-ऑगस्ट २०२२ मध्ये, १५ लाख लोकांनी नवीन इकॉनॉमी कोचमधून प्रवास केला आणि १७७ कोटी रुपये कमावले.
  • हा प्रयोग यशस्वी झाल्याचे दिसत असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
  • या कालावधीत सामान्य एसी-३ वर्गातील प्रवाशांच्या संख्येत कोणतीही घट झालेली नाही.
  • याच कालावधीत सामान्य एसी-३ श्रेणीतून रेल्वेला ८ हजार २४० कोटी रुपयांचा महसूल मिळाला.
  • नवीन एसी-३ इकॉनॉमी क्लास कोचमध्ये ८३ जागा आहेत, तर सामान्य एसी-३ डब्यांमध्ये ७२ जागा आहेत. . नॉर्मल एसी-३ कोचमध्ये दोन बाजूचे बर्थ आहेत, जे नवीन कोचमध्ये तीन करण्यात आले आहेत.
  • रेल्वेने आतापर्यंत अशा ३७० डब्यांचा प्रवास सेवेत समावेश केला आहे.

पाहा व्हिडीओ:


Tags: AC-3Economy AC Coachgood newsindian railwaysmuktpeethuseful newsइकॉनॉमी एसी कोचउपयोगी बातमीचांगली बातमीभारतीय रेल्वेमुक्तपीठ
Previous Post

नवरात्रोत्सव: कोल्हापुरात महिला पर्यटकांना जिल्हा प्रशासनाच्यावतीने भेटवस्तूंचे वाटप

Next Post

पहिल्या राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवात ‘फाईव्ह टेल्स ऑफ मल्लाभूम’ची बाजी

Next Post
National Tourism Short Film Festival

पहिल्या राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवात 'फाईव्ह टेल्स ऑफ मल्लाभूम'ची बाजी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!