Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

उत्तर भारतीय सांस्कृतिक कार्यक्रम रद्द, कोकणात मदत देणार!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
gnm1

मुक्तपीठ टीम

कोकणाला बसलेला पुराचा तडाखा महाराष्ट्राला आपलं म्हणणाऱ्या अनेक अमराठी भाषिकांना हेलावणारा ठरला आहे. मुंबईकर उत्तर भारतीयांच्या ‘अभियान’ या सामाजिक-सांस्कृतिक संस्थेतर्फे १७ वर्षांपासून सातत्याने आयोजित करण्यात येणारा कजरी महोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कजरी महोत्सवावर खर्च करण्यात येणारी रक्कम कोकणातील पूरग्रस्त भागातील लोकांच्या मदतीसाठी खर्च केली जाईल, अशी माहिती फिल्मसिटी महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि ‘अभियान’चे संस्थापक अमरजीत मिश्रा यांनी दिली आहे.

 

स्त्री शक्ती सन्मानाचा हा कार्यक्रम, जो गेल्या १७ वर्षांपासून आयोजित केला जातो. कोरोना काळातही लोकांनी व्हर्चुअल पद्धतीने या महोत्सवाचा आनंद घेतला. यावर्षी हा महोत्सव ७ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान होणार होता. मात्र यावेळी, अतिवृष्टीमुळे कोकणात झालेल्या नुकसानामुळे मुंबईतील उत्तर भारतीयांनी यावर्षी हा महोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी त्यांनी कोकणातील लोकांना संदेश दिला आहे की, ‘कोंकण के करबय गुलजार हो, कतव न ही सून मोरे भईया’ म्हणजेच “कोकणात झालेला विंध्वंस तसाच नाही राहू द्यायचा, पुन्हा तिथं उल्हास फुलवायचा!”

 

या वेळी मुंबईच्या उत्तर भारतीयांना जरी प्रसिद्ध कजरीचे बोल “मिर्झापूर कैल्या गुलजार हो, कचोडी गली सून कैल्या बालामू” ऐकू येणार नसले तरी मुंबईच्या उत्तर भारतीयांनी निष्ठा व्यक्त केली आहे. मिश्रा यांनी सांगितले की, लोक परंपरेचा प्रसार करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा महोत्सव यावर्षी रद्द करून, आता कर्मभूमीमध्ये उद्भवलेल्या आपत्तीला तोंड देण्यासाठी सहकार्य केले जाईल.

 

नेमका काय आहे कजरी महोत्सव?

  • कजरी म्हणजे उत्तरप्रदेशातील लोकगीतांचा उत्सव
  • कजरी महोत्सव आणि स्त्री शक्ती सन्मानाचा हा कार्यक्रम
  • मुंबईत गेल्या १७ वर्षांपासून सातत्याने आयोजित केला जात आहे.
  • गेल्या वर्षी कोरोना काळातही लोकांनी व्हर्चुअल पद्धतीने महोत्सवाचा आनंद घेतला होता.

 

“बेटी बचाओ बेटी पढाओ” अंतर्गत विविध क्षेत्रातील सर्वोत्तम महिलांना दिला जाणारा स्त्री शक्ती सन्मान कार्यक्रम ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात आयोजित केला जाईल.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: AbhiyaanKajari mohostavKonkanNorth Indian Communityअभियानकजरी महोत्सवकोकण
Previous Post

नांदेड, वर्धा, भंडारा, गोंदिया, नंदुरबार…रविवारी कोरोना सुट्टीवर! एकही नवा रुग्ण नाही! 

Next Post

पूरग्रस्तांसाठी माणुसकीचा महापूर…अवघा महाराष्ट्र एकवटला!

Next Post
Help to flood affected

पूरग्रस्तांसाठी माणुसकीचा महापूर...अवघा महाराष्ट्र एकवटला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!