मुक्तपीठ टीम
राज्यातील महाविकास आघाडी सरकारला सत्तेचे अडीच वर्षे पूर्ण होत असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसलाही मुख्यमंत्रीपदाचे वेध लागले असल्याची चर्चा आहे. त्यासाठी कारण ठरलंय, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उस्मानाबाद दौऱ्यादरम्यान तुळजाभवानी देवीला घातलेलं साकडं. ‘पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होऊ दे, पूर्ण राष्ट्रवादी घेऊन नवस फेडणार’ असं साकडं त्यांनी देवीचे दर्शन घेताना घातलं. त्यावरुन आता शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांना खोचक टोला लगावला आहे. ते म्हणाले, राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री पण २५ वर्षांनी! शिवसेना नेते संजय राऊत यांनीही २५ वर्षे उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री या विधानाचा पुनरुच्चार केला आहे.
मुख्यमंत्रिपदाबाबत सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य!!
- सुप्रिया सुळे रविवारी उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या.
- या दौऱ्यादरम्यान त्यांनी अनेक धार्मिक स्थळांना भेटी दिल्या.
- तसेच येथील लोकांसोबत चर्चा केली.
- सुप्रिया सुळेंनी तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीचेदेखील दर्शन घेतले.
- या दर्शनानंतर त्यांनी पत्रकरांशी संवाद साधला.
- यावेळी त्यांनी ‘पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होऊ दे पूर्ण राष्ट्रवादी घेऊन नवस फेडणार’ असं साकडं घातलं.
- महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री कधी मिळणार या प्रश्नाचे उत्तर देताना मी याबद्दल सांगू शकत नाही.
- मी काही ज्योतिष सांगणारी नाही.
- मुख्यमंत्री व्हावं की नाही याबाबत मी कधी विचार केलेला नाही.
- हे सगळं महाराष्ट्रातील लोक ठरवतील मी कसं ठरवणार.
अब्दुल सत्तार यांचे प्रत्युत्तर…
- महिला मुख्यमंत्री करायच्या असतील तर रश्मी ठाकरे सुसज्ज आहेत.
- त्यांना राजकारणाचा अभ्यास आहे.
- शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यासाठी महाराष्ट्राच्या तमाम मंदिरांमध्ये आधीच पूजा झालेली आहे.
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे २५ वर्षे मुख्यमंत्री पदी राहतील.
- सुप्रिया सुळे मुख्यमंत्री कोणत्या तारखेला होणार याबद्दल मी बोलणं योग्य होणार नाही.
- २५ वर्षानंतर त्यांचा नंबर लागावा हीच ईश्वरकडे आमची प्रार्थना आहे.
संजय राऊतांचा पुनरुच्चार! २५ वर्षे उद्धव ठाकरेच!!
- उद्धव ठाकरे सध्या मुख्यमंत्री असून हेच २५ वर्ष मुख्यमंत्री राहतील, असं सुप्रिया सुळेंचं म्हणणं आहे.
- महाराष्ट्राच्या राजकारणात असे संभ्रम काही लोक निर्माण करत असतात.
- सध्या महाराष्ट्रात आघाडीचं सरकार आहे. आघाडीचं नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत.
- शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, सोनिया गांधी, राहुल गांधी हे सर्वजण उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर आनंदी आहेत. त्यामुळे कोणी प्रश्न निर्माण केला असेल तर त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे.