मुक्तपीठ टीम
आम आदमी पार्टी मुंबईची कोविड – १९ हेल्पलाईनवर मोठ्या संख्येनं फोन कॉल येत आहेत. कोरोना संकटाच्या या प्रतिकूल काळात आपची हेल्पलाईन मुंबईकरांसाठी आशेचा किरण ठरते आहे. आपची ही ‘आप’ली सेवा आपच्या नेत्या प्रिती शर्मा मेनन यांच्या शब्दात:
गेल्या आठ दिवसांत आम आदमी पार्टीच्या हेल्पलाईन उपक्रमाद्वारे २००० हून अधिक लोकांना मदत करण्यात आली ज्यांना कोरोना संबंधित तातडीच्या मदतीची गरज होती. हा आकडा कदाचित मोठा नाहीए परंतू महामारीच्या या महासागरात आम्ही निदान या लोकांना मदत करून, त्यांचं आयुष्य पुन्हा उभारू शकलो याचा आम्हाला अभिमान आहे.
जेव्हा एप्रिलच्या पहिल्या दोन आठवड्यात आप मुंबईच्या नेता प्रिती शर्मा मेनन आणि रूबेन मास्कारनेस यांना कोरोनाच्या मदतीसाठी प्रचंड फोन येत होते तेव्हा आप मुंबई टास्क फोर्स चे मेंबर मिथिला नाईक साटम, कुणाल पवार आणि मनु पिलाई यांनी एकत्रित येऊन #आपदेगासाथ हेल्पलाईन ७७१८८१२२०० , १५ एप्रिल २०२१ मध्ये लॉन्च केली.
आपचे नेते आणि कार्यकर्ते विविध कोरोना रूग्णांचे रूग्णालय भरतीसाठीचे, आय सी यु बेड साठीचे, ऑक्सिजन, औषधं, प्लास्मा साठीचे शेकडो फोन कॉल हाताळत होते. ते रूग्णांच्या समस्या सोडवण्यासाठी रूग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांशी संपर्क साधत होते.
गेल्या ८ दिवसांत आम्ही साधारणतः दिवसाला ७०० फोन हाताळत आहोत. पैकी दररोज जवळपास ३०० केसेस सोडवण्यासाठी आम्हाला यश येत आहे. रूबेन मास्कारनेस याच्या प्रतिनिधित्वाखाली मिथिला नाईक साटम, मनु पिलाई, प्रविण लोटणकर, कुणाल पवार यांसारखे तरूण कार्यकर्ते तसेच सुमित्रा श्रीवास्तव आणि द्वीजेंद्र तिवारी सारखे सिनियर लीडर अहोरात्र लोकांना मदत करण्यासाठी झटत आहेत. हे दुखाःस्पद आहे की विविध गोष्टींच्या कमतरतेमुळे आम्ही सगळ्या केसेस सोडवू शकत नाही आहोत. कालचं वातावरण तर इतकं गंभीर होतं की रूग्णालयं अत्यंत गंभीर रूग्णांना भरती करायला नकार देत होते कारण त्यांच्याकडे ऑक्सिजनचा साठा अत्यंत कमी होता. आमचे सर्व कार्यकर्ते हे या सगळ्या गोष्टींमुळे ताण तणावाखाली जात आहेत कारण कारण शहरातील अपुऱ्या साधनांमुळे पोट तिडकीने एखाद्या रूग्णाला मदत करावीशी वाटत असतानाही त्यांना ती पूर्णतः करता येत नाहीए. या सगळ्याचा परिणाम इतका आहे की आता आम्हाला त्यांच्यासाठी या सर्व परिस्थितीचा सामना करण्यासाठी काऊंन्सलिंग करावं लागत आहे. तरीसुद्धा या गंभीर परिस्थिती मध्ये आपल्या प्रिय मुंबईकरांना मदत करण्याचा त्यांचा जजबा कमी नाही.
आम्ही आमची कथा तुमच्या सोबत शेअर करत आहोत कारण आम्हाला आशा आहे की अधिकाधिक लोकं हे ऐकून आम्हाला मदत करण्यासाठी पुढे सरसावतील आणि अधिकाधिक लोकांना हे कळू शकेल कि त्यांना या भयंकर परिस्थितीचा सामना करण्यासाठी मदत करायला कोणाची तरी सोबत आहे.
आम्हाला खूप बरं वाटतं आहे की आज अनेक एन.जी.ओ., मीडियातील माणसं आणि सामाजिक कार्यकर्ते आमच्या या मदत कार्यात आम्हाला मदत करून बळ देत आहेत. या सगळ्या सोबती मुळे आम्हाला केवळ कार्यरत्यांची साखळी बांधता येत नाहीए तर यामुळे आम्ही डॉ. संतोष करमरकर आणि स्विच इंडियाचे तरुण डॉक्टर्स यांच्या मार्गदर्शनाखाली एक टीम उभारू शकतोय जी प्रत्येक पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांना फोन करून त्यांचं काऊंन्सलिंग करत आहे.
जेव्हा प्रशासन पॉलिसीच्या बळाखाली कोसळून पडतं तेव्हा आपण नागरिकांनी पुढे सरसावून खचून न जाता उभं राहायचं. सोबतीने आपण बरचं काही करू शकतो !