Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राजर्षी शाहू महाराज तसेच माता रमाबाई यांचे स्मारक प्रेरणादायी व्हावे

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे प्रतिपादन

October 14, 2021
in घडलं-बिघडलं
0
Rajashri Shahu maharaj and mata rama bai smarak

मुक्तपीठ टीम

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे गिरगाव आणि वरळी येथील तसेच माता रमाबाई यांचे वरळी येथील प्रस्तावित स्मारक प्रेरणादायी व्हावे, अशा दृष्टीने या स्मारकांची उभारणी करावी, असे निर्देश पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले. याचबरोबर काळा घोडा परिसरात सुटीच्या दिवशी येणाऱ्या पर्यटकांची मोठी संख्या पाहता येथील पादचारी रस्त्यांचे सुशोभीकरण करण्याची सूचना त्यांनी केली.

 

ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीवकुमार, वाहतूक विभागाचे अतिरिक्त आयुक्त सत्यनारायण चौधरी, महानगरपालिकेचे उपायुक्त हर्षद काळे, सहायक आयुक्त शरद उघडे, प्रशांत गायकवाड आदी उपस्थित होते.

 

पर्यटन मंत्री ठाकरे म्हणाले, दोन्ही स्मारकांना भेट देणाऱ्या भाविकांना येथे आल्यावर प्रसन्न वाटेल आणि या महान व्यक्तिमत्वांच्या कार्याची माहिती मिळेल तसेच ही उत्कृष्ट स्मृतीस्थळे ठरतील असे आकर्षक डिझाईन तयार करून घ्यावे. स्मारक आणि परिसरात छोटे उद्यान तयार करून तेथे भेट देणाऱ्यांसाठी बसण्याची सोय करावी. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या गिरगावमधील प्रस्तावित स्मारकाजवळ क्यूआर कोडद्वारे त्यांच्या कार्याची माहिती देता येईल असे पहावे. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील निवासी मोठ्या प्रमाणात राहत असलेल्या वरळी परिसरातही चांगले स्मारक उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

 

काळा घोडा परिसरात सुटीच्या दिवशी नागरिक मोठ्या संख्येने येतात. या भागात फिरण्यासाठी मुख्य रस्त्यांबरोबरच आतील जोडरस्त्यांवर पादचाऱ्यांसाठी सुविधा तयार करण्याच्या तसेच या रस्त्यांचे सुशोभीकरण करण्याच्या सूचनाही ठाकरे यांनी दिल्या. या कामाबरोबरच त्यांनी दहिसर येथे तसेच शहरातील विविध रस्त्यांवर होणारी वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी सुरू असलेले काम, गिरगाव चौपाटीजवळ सुरू असलेले दर्शक गॅलरीचे काम आदींचाही आढावा घेऊन कामांना गती देण्याचे निर्देश दिले.


Tags: Aaditya Thackeraycm uddhav thackeraysanjiv kumarआदित्य ठाकरेमुख्यमंत्री उद्धव ठाकरेसंजीवकुमार
Previous Post

एकरकमी एफआरपीच्या आदेशाबद्दल भाजपा प्रदेश किसान मोर्चातर्फे मोदी सरकारचे अभिनंदन

Next Post

मलिकांचा एनसीबीविरोधात तिसरा गौप्यस्फोट! गांजा नसताना बातम्या पेरून लोकांची बदनामी!

Next Post
NCP-NCB

मलिकांचा एनसीबीविरोधात तिसरा गौप्यस्फोट! गांजा नसताना बातम्या पेरून लोकांची बदनामी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!