Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“लसीकरण शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे”

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे आवाहन

August 2, 2021
in सरकारी बातम्या
0
vaccination

मुक्तपीठ टीम

मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध खाजगी रुग्णालये आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्याने मोफत लसीकरण मोहीम राबविली जात आहे. या माध्यमातून नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.

 

सर्व नागरिकांचे कोरोना लसीकरण लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. लसीकरणाशिवाय या आजाराचा धोका कमी होणार नाही. यासाठी मुंबई महानगरपालिका आणि एच एन रिलायन्स फाऊंडेशनच्या सौजन्याने मुंबईत दीड लाख नागरिकांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. याचा शुभारंभ ठाकरे यांच्या उपस्थितीत वरळी कोळीवाडा येथे करण्यात आला.

 

पर्यावरण मंत्री ठाकरे म्हणाले, मुंबईची लोकसंख्या विचारात घेता येथे लसीकरणाचा वेग वाढविला जातो आहे. यासाठी मुंबई महानगरपालिकेसोबत सातत्याने आढावा घेतला जात आहे. या मोहिमेत खाजगी रुग्णालये आणि कंपन्यांच्या सीएसआर निधीचा उपयोग करून लसीकरण करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार रिलायन्स फाऊंडेशन स्वतःहून पुढे आले असून त्यांच्या सौजन्याने ही मोहीम राबविली जात आहे.

 

महाराष्ट्र हे एक कोटींहून अधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण करणारे राज्य आहे. तथापि इतरही राज्यांचे लसीकरण पूर्ण होणे आवश्यक आहे. तोपर्यंत कुणीही सुरक्षित असणार नाही. मुंबईत सुमारे ५५ लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे. नागरिकांनी दुसरा डोसही वेळेत पूर्ण करावा, तसेच कोरोना बाबतच्या नियमांचे आवर्जून पालन करावे, असे आवाहन ठाकरे यांनी केले.

 

कोरोना नियंत्रित ठेवण्यासाठी मुंबई महानगरपालिका करीत असलेल्या अथक प्रयत्नांचे कौतुक करून ठाकरे यांनी महापालिकेच्या संपूर्ण टीमचे आभार मानले.

 

यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी, रिलायन्स फाऊंडेशनच्या डॉ.तरंग आदी उपस्थित होते. यानंतर या मोहिमेअंतर्गत सायन कोळीवाडा येथील प्रतीक्षानगर शाळा संकुलात आयोजित लसीकरण शिबिरासही ठाकरे यांनी भेट देऊन पाहणी केली.


Tags: Aaditya ThackerayBMCmumbaivaccinationआदित्य ठाकरेकिशोरी पेडणेकरमुंबईमुंबई महानगरपालिकारिलायन्स फाऊंडेशनसुरेश काकाणी
Previous Post

“महापुरासारख्या समस्यांवर कायमस्वरुपी उपाययोजनांना प्राधान्य; पूररेषेची अमंलबजावणी काटेकोरपणे व्हावी”

Next Post

वक्फ मंडळाच्या निवडणुकीसाठी मतदारयादी अद्ययावत करण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Next Post
waqf board elections

वक्फ मंडळाच्या निवडणुकीसाठी मतदारयादी अद्ययावत करण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!