मुक्तपीठ टीम
आज आधार कार्ड हे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. आधार कार्डविना अनेक सरकारी योजनांचा लाभ आपल्यापर्यंत पोहचू शकत नाही. अशा परिस्थितीत, जर आधार कार्ड नसेल आणि तुम्हाला ते बनवायचे असेल तर ही बातमी उपयुक्त आहे. याशिवाय, जर आधार कार्डमधील नाव, पत्ता बदलायचा असेल तर घर बसल्या ते कसे करावे याबाबतही माहिती देण्यात आलेली आहे.
आधार कार्ड ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने बनवता येते. तसेच, जर आधार कार्डमधील नाव, आडनाव, पत्ता बदलायचा असेल तर, ते सहज करता येते.
आधार कार्ड ऑनलाइन लॉगीन प्रक्रिया…
- सर्व प्रथम लॅपटॉप किंवा मोबाईलमध्ये आधार कार्डचे अधिकृत पोर्टल https://ask.uidai.gov.in/ उघडा.
- येथे login चा पर्याय दिसेल.
- यासाठी मोबाईल नंबर आणि कॅप्चा भरावा लागेल, त्यानंतर त्यात लॉग इन करता येईल.
घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने आधार कार्ड बनवा किंवा त्यातील चुकांमध्ये बदल करा
- जर अजूनही आधार कार्ड बनवले नसेल, तर प्रथम मेक आधार कार्ड या पर्यायावर तपशील शेअर करा.
- लॉग इन केल्यानंतर, नाव आणि आडनाव पर्याय भरा.
- यानंतर दिलेल्या नंबरवर एक ओटीपी कोड पाठवला जाईल.
- दिलेल्या ठिकाणी ओटीपी भरा.
- असे केल्याने, सेल्फ-सर्व्हिसचा पर्याय येईल, जिथे तुम्ही तुमचे नाव, आडनाव इत्यादी बदलू शकता.
आधार कार्ड काढण्यासाठी किंवा त्यात बदल करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. फक्त एक सहाय्यक दस्तऐवज शेअर करणे आवश्यक आहे, जे अधिकृत सरकारी एजन्सीद्वारे जारी केलेले प्रमाणपत्र असावे. या प्रमाणपत्रात पत्ता अनिवार्य आहे.