मुक्तपीठ टीम
अहमदनगर जिल्ह्याला हादरवून टाकणारं यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांचं हत्याकांड. या हत्याकांडाला मंगळवार ३० नोव्हेंबरला १ वर्ष पूर्ण झाले आहे. या हत्याकांडातील मुख्य आरोपी पत्रकार बाळा बोठे आणि त्याच्यासह ११ आरोपींना अटक करून न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मात्र वर्ष झाले असून त्यावर सुनावणी झाली नाही.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
- ३० नोव्हेंबर २०२० रोजी रात्री साडेआठच्या सुमारास पारनेर तालुक्यातील जतेगाव घाटात रेखा जरे यांच्यावर अज्ञात मारेकऱ्यांनी हल्ला केला होता.
- मोटरसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात २५ ते ३० वयोगटातील तरुणांनी गाडीला धक्का लागल्याचे कारणावरून रेखा जरे यांच्याशी वाद घातला होता.
- काही वेळाने या तरुणांनी धारदार शस्त्रानं रेखा जरे यांच्या गळ्यावर वार केले होते.
- गंभीर जखमी अवस्थेत रेखा जरे यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले होते. मात्र, त्या आधीच त्यांचा मृत्यू झाला होता.
बोठेला हैदराबादमध्ये अटक
- तब्बल १०२ दिवसांनंतर १२ मार्च २०२१ रोजी बोठे याला हैदराबाद येथे अटक झाली.
- त्यावेळी बोठेला फरार होण्यास मदत करणार्या आरोपींना अटक झाली.
- आरोपी बाळ बोठे सध्या न्यायालयीन कोठडीत असून पारनेर तुरुंगात शिक्षा भोगत आहे.
सुनावणीही प्रलंबित
- या खटल्यात ११ जणांना अटक झाली असून त्यांच्याविरुद्ध आरोपपत्रही दाखल झाले आहे.
- मात्र त्यावरील सुनावणी अद्याप सुरू झालेली नाही.
- मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठे याच्यासह ११ आरोपींविरुद्ध आरोप निश्चितीची प्रक्रिया झाल्यावर या खून खटल्याची न्यायालयात नियमित सुनावणी सुरू होईल.
- दरम्यान या प्रकरणातील आरोपी सागर भिंगारदिवे आणि बाळ बोठे यांनी जामिनासाठई जिल्हा न्यायालय व औरंगाबाद खंडपीठात अर्ज केले असून त्यावरील सुनावणीही प्रलंबित आहे.