मुक्तपीठ टीम
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज म्हटलं की सामाजिक सुधारणा घडवणारा एक अस्सल क्रांतीकारी समाजसुधारक राजा डोळ्यासमोर येतो. पण शाहू महाराज म्हणजे केवळ सामाजिक, शैक्षणिक कार्य नाही. हा राजा काळाच्या पुढचा विचार फक्त सामाजिक बाबतीत करत नसे तर व्यावसायिक क्षेत्रातही करत असे. त्यातूनच त्यांनी कोल्हापुरात श्री शाहु छत्रपती मिलची उभारणी केली. मात्र, शाहु महाराजांनी मिलची मालकी स्वतः कडे न ठेवता करवीर संस्थानची मालकी ठेवली. शाहु राजांचा हा वेगळा पैलू लक्षात घेत लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वानिमित्त कापड जत्रेचं आयोजन करण्यात आलं. जत्रेत संयोगिताराजे छत्रपती आणि संभाजीराजे छत्रपतीही सहभागी झाले होते.
‘कापड जत्रेतील कापडाचा पोत आणि उत्तम दर्जा पाहून असे कापड आपल्या जिल्ह्यात निर्माण होते याचा कोल्हापूरकर म्हणून आपल्याला अभिमान आहे’, अशी भावना संयोगिताराजे छत्रपती यांनी व्यक्त केली. व्यापार, उद्योगाला चालना देण्याबरोबरच रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशानं शाहू महाराजांनी श्री शाहु छत्रपती मिलची उभारणी केली. शाहु महाराजांनी मिलची मालकी स्वतः कडे न ठेवता करवीर संस्थानची मालकी ठेवली, शाहु राजांचा हा वेगळा पैलू यातून दिसून येतो. या ठिकाणी शाहू महाराजांचे जिवंत स्मारक व्हावं. स्मारकामध्ये टेक्सटाइलचं एक दालन असावं, अशी अपेक्षा छत्रपती संभाजीराजे यांनी उद्घाटन प्रसंगी व्यक्त केली.
पाहा व्हिडीओ: