मुक्तपीठ टीम
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले एलॉन मस्क हे नेहमीच त्यांच्या अनोख्या विचारांनी आणि आविष्कारामुळे चर्चेत असतात. टेस्ला आणि स्पेसएक्स सारख्या कंपन्यांची स्थापना करणारे मस्क तंत्रज्ञानाच्या जगात भविष्याबद्दल बोलतात. नुकतेच, मस्क यांनी एका एआय इव्हेंटमध्ये आपला मानवीय रोबोट ऑप्टिमस लॉंच करून जगाला आश्चर्यचकित केले. एलॉन मस्क यांचे म्हणणे आहे की, त्यांच्या कार व्यवसायापेक्षा रोबोटचा व्यवसाय अधिक यशस्वी होईल.
लवकरात लवकर उपयुक्त ह्युमनॉइड रोबोट बनवण्याचे उद्दिष्ट!
- एलॉन मस्कने आता एआय-चालित ऑटो पायलटलेस कारच्या बाबतीत आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. कार्यक्रमात रोबोट चालताना आणि पुढे सरकताना आणि प्रेक्षकांसमोर हात मिळवताना दिसला.
- यासोबतच लोकांना एक व्हिडीओही दाखवण्यात आला आहे, ज्यामध्ये रोबोट पेटी उचलताना, झाडांना पाणी घालताना आणि माणसांप्रमाणे वागताना दाखवला आहे.
- अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील टेस्लाच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात मस्क म्हणाले की, लवकरात लवकर उपयुक्त ह्युमनॉइड रोबोट बनवणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
माणसांप्रमाणे प्रत्येक गोष्ट रोबो करू शकणार…
- ऑप्टिमस सुरुवातीला लहान-मोठे कार्ये करेल, जसे की टेस्लाच्या कारखान्यांमध्ये वस्तू हलवणे आणि कारचे बोल्ट घट्ट करणे. . ह्युमनॉइड रोबोट्स कंपनी एजिलिटी रोबोटिक्सचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी जोनाथन हर्स्ट सांगतात की, अशी अनेक कामे आहेत जी मानव सहज करू शकतो आणि तीच कामे रोबोट्ससाठी कठीण असतील.
- मस्क म्हणाले की, भविष्यात या रोबोट्सचा वापर घरातील कामे करण्यासाठी आणि संभोग करण्यासाठीही केला जाऊ शकतो.
पुढील वर्षापासून उत्पादन सुरू होण्याती शक्यता
- रोबोटसाठी सर्वात महत्त्वाची चाचणी असेल की, तो अनपेक्षित परिस्थिती हाताळण्यास सक्षम आहे की नाही.
- गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये एआय इव्हेंटमध्ये मस्क यांनी पहिल्यांदा टेस्लाच्या ह्युमनॉइड रोबोटची योजना जाहीर केली.
- यावर्षी रोबोटच्या प्रोटोटाइपला अंतिम रूप देण्यासाठी त्यांनी हा कार्यक्रम ऑगस्ट ऐवजी सप्टेंबरच्या अखेरीस आयोजित करण्याचा निर्णय घेतला.
- आता ते पुढील वर्षापासून या रोबोट्सचे उत्पादन सुरू करू शकतात.
- अॅरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीच्या रोबोटिक्सच्या प्राध्यापक हेनी बेन अमोर म्हणतात, मानवासारखे हात तयार करणे, जे वस्तू पकडतात आणि उचलतात, हे सर्वात आव्हानात्मक आहे.