Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कुर्ला परिसरातील भेसळयुक्त तेलाची विक्रीकरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

दोन आरोपींना अटक तर पळून गेलेल्या मालकासह दोघांचा शोध सुरु

January 30, 2021
in कायदा-पोलीस
0
adulterated oil

मुक्तपीठ टीम

 

रासायनिक प्रक्रिया केलेल्या भेसळयुक्त तेलाची विक्री करणार्‍या एका टोळीचा गुन्हे शाखेच्या सीबी कंट्रोल विभागाच्या अधिकार्‍यांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी रामजी गौतम आणि रामदुलार पासी या दोघांना पोलिसांनी अटक केली तर त्यांचा मालक नजीर खान आणि रमेश सोनी हे कारवाईची माहिती मिळताच पळून गेले आहेत, त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम सुरु केली आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक नितीन पाटील व त्यांच्या पथकाने सुमारे अकरा लाख रुपयांचा साडेचौदा हजार लिटरचा काळ्या तेलाचा साठा जप्त केला आहे.

 

अटकेत असलेल्या दोन्ही आरोपींना नंतर विनोबा भावे नगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. मुंबई शहरात काळ्या तेलावर रासायिक प्रक्रिया करुन अशा भेसळयुक्त तेलाची विक्री करणार्‍या काही टोळ्या आहेत, या टोळ्याविरुद्ध यापूर्वीही पोलिसांनी कारवाई केली होती, तरीही त्यांच्या छुप्या कारवाया सुरुच होत्या.

 

 

कुर्ला परिसरात अशाच प्रकारे एक टोळी कार्यरत आहे, ही टोळी शहरातील विविध गॅरेजमधून टाकून देण्यात येणारे काळे तेल जमा करुन कुर्ला येथील गोदामामध्ये साठवून ठेवतात, नंतर ते काळे तेल वाडा येथील कारखान्यात पाठविले होते, तिथेच या तेलावर रासायनिक प्रक्रिया करुन अशा भेसळयुक्त तेलाची बाजारात विक्री होत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांना मिळाली होती, या माहितीनंतर पोलीस निरीक्षक नितीन पाटील व त्यांच्या पथकाने शुक्रवारी कुर्ला येथील क्रांतीनगर, बीएमके कंपाऊंडमध्ये छापा टाकला होता, यावेळी तिथे पोलिसांना मोठ्या प्रमाणात काही ड्रममध्ये काळ्या तेलाची साठवणूक केल्याचे दिसून आले.

 

या कारवाईत पोलिसांनी सत्तरहून अधिक ड्रम आणि आतील साडेचौदा हजार लिटर काळ्या तेलाचा साठा जप्त केला आहे. त्याची किंमत ११ लाख ३६ हजार ८६० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. यावेळी तिथे असलेल्या रामजी गौतम आणि रामदुलार पासी या दोघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले, त्यांच्या चौकशीत त्यांचा मालक नजीर खान व त्याचा सहकारी रमेश सोनी असून त्यांच्याच सांगण्यावरुन ते तिथे काळे तेल जमा करतात, नंतर ते तेल वाडा येथील कारखान्यात पाठविले जाते, या कारखान्यात या तेलावर रासायनिक प्रक्रिया करुन नंतर अशा भेसळयुक्त तेलाची बाजारात विक्री केली जात असल्याची कबुली दिली.

 

त्यानंतर पोलीस शिपाई विशाल यादव यांच्या तक्रारीवरुन विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात या टोळीविरुद्ध २८५, ३३६, ३४ भादवीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता, याच गुन्ह्यांत नंतर या दोघांना अटक करुन त्यांचा ताबा संबंधित पोलिसांकडे सोपविण्यात आला. या गुन्ह्यांत नजीर आणि रमेश या दोघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे, कारवाईनंतर ते दोघेही पळून गेल्याने त्यांचा आता पोलीस शोध घेत आहेत.


Tags: adulterated oilKurlamumbaimumbai pliceकुर्लाटोळीभेसळयुक्त तेल
Previous Post

मराठ्यांसह सर्व क्षत्रियांना आरक्षणाची रामदास आठवलेंची मागणी

Next Post

#व्हाअभिव्यक्त! पुण्यातील लालमहाल का अद्याप बंदच?

Next Post
lalmahal

#व्हाअभिव्यक्त! पुण्यातील लालमहाल का अद्याप बंदच?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!