Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता सोने कर्जमाफी! भाजपाच्या मित्रपक्षाचं भन्नाट आश्वासन!

March 12, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
gold loan

मुक्तपीठ टीम

शेतकरी कर्जमाफी म्हटलं तर काहींना ते सरकारने विनाकारण घेतलेलं ओझ वाटतं. पण भारतातील एका राज्यात चक्क सोन्यावर कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले आहेत. भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या अण्णाद्रमुक या पक्षाने सोन्यावर कर्जमाफीचे आश्वासन तामिळी मतदारांना दिले आहे. निवडणुकीच्या घोषणेपूर्वी अण्णाद्रमुकने ४८ ग्रॅमपर्यंतची कर्जमाफीचे आश्वासन दिले आहे. विरोधातील द्रमुकला सोने कर्जमाफीच्या डावावर काय प्रतिडाव टाकावा, असा प्रश्न पडलाय!

अण्णा द्रमुकच्या सोने कर्जमाफी आश्वासनाचा लाभ निवडणुकीच्या रिंगणात दिसण्याची शक्यता आहे. तामिळनाडूमधील सहकारी संस्थांनी वितरित केलेल्या २० हजार कोटी कर्जापैकी सुमारे ४०% भाग याच सोन्याच्या कर्जाचा आहे.

 

राज्याच्या राजकारणात सोन्याचे महत्त्व

  • तामिळनाडूच्या राजकारणात सोन्याच्या कर्जाला खूप महत्त्व आले आहे, कारण तेथील सहकारी संस्थांची वेगळ्या अर्थपुरवठ्याची स्थिती हे कारण आहे.
  • आपल्या सहकारी बँका सहसा शेतीविषयक कर्ज देतात, परंतु तामिळनाडूमध्ये ४० हून अधिक सहकारी बँका, ४ हजारांहून अधिक पतपेढ्या सोने गहाण ठेवण्याच्या बदली कर्ज देतात.
  • सहकारी संस्थांकडून वितरित करण्यात आलेल्या २० हजार कोटी कर्जांपैकी सुमारे ७००० कोटी सोन्याच्या कर्जाचे आहे, यावरून सोने कर्जाचे महत्व कळू शकते.
  • महिला बचत गटातील सुमारे १५.५ लाख सदस्यांना सोने कर्जमाफीचा लाभ मिळू शकेल. अण्णा द्रमुकच्या या आश्वासनामुळे महिलांची मन जिंकण्यात मदत होईल.

 

दक्षिणेत सोन्याला जास्तच महत्व

  • संपूर्ण देशातील एक तृतीयांश हॉलमार्क सेंटर येथे आहेत.
  • सोन्याचे दागिने हे दक्षिणेकडील राज्याच्या संस्कृतीचा एक भाग आहे.
  • जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा लोक हे सोने गहाण ठेवून सोन्यावर कर्ज घेतात.
  • सोने कर्ज माफी ही एक योजना आहे जी इथल्या बर्‍याच मतदारांना प्रभावित करते.
  • दक्षिणेत सोन्याचे पाच-सात मजली शोरूम असतात, जे शॉपिंग मॉल्ससारखे आहेत.
  • अनेक बहुमजली शोरूम आहेत जिथे ६ ते ८ क्विंटल सोन्याचे दागिने आहेत.

Tags: aiadmkgold loanअण्णा द्रमुकतामिळनाडूद्रमुकसहकारी संस्थांसोने कर्जमाफी
Previous Post

देशातील कोरोनाच्या दहा सुपर हॉटस्पॉटपैकी महाराष्ट्रात आठ!

Next Post

काँग्रेस संसदीय पक्षात बदल, अधीर रंजनऐवजी आता रवनीत सिंह बिट्टूंवर मोठी जबाबदारी

Next Post
bittu

काँग्रेस संसदीय पक्षात बदल, अधीर रंजनऐवजी आता रवनीत सिंह बिट्टूंवर मोठी जबाबदारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!