मुक्तपीठ टीम
एमपीएससी पूर्व परीक्षा येत्या रविवारऐवजी आता पुढील आठवडाभरात होईल. राज्य लोकसेवा आयोग शुक्रवारी नवी तारीख जाहीर करणार आहे. १४ मार्च रोजी होणारी एमपीएससी पूर्व परीक्षा लोकसेवा आयोगाने कोरोनामुळे लांबणीवर टाकली. त्यानंतर राज्यभरात उमेदवारांकडून निर्णयाविरोधात संतप्त पडसाद उमटले. त्यानंतर आता नवी तारीख शुक्रवारी जाहीर केली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
एमपीएससी पूर्व परीक्षा १४ मार्चऐवजी २१ मार्च रोजी होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी १२ मार्च रोजी राज्य लोकसेवा आयोग नवी तारीख जाहीर केली आहे. राज्य सरकारने हे स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली. येत्या रविवारी ही परीक्षा होणार होती, पण वाढत्या करोना संक्रमणामुळे राज्य लोकसेवा आयोगाने ती लांबणीवर टाकली. याचे राज्यभर उमेदवारांमध्ये तीव्र पडसाद राज्यात उमटले.
मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधताना सुरुवातीलाच एमपीएससी परीक्षेविषयीचे स्पष्टीकरण दिलं, “मी विद्यार्थ्यांच्या भावनांशी सहमत आहे. केवळ काही दिवसांसाठी परीक्षा पुढे ढकलत आहोत. शुक्रवारी आयोगामार्फत ही तारीख जाहीर केली जाणार आणि ही तारीख येत्या आठवड्याभरातच होईल. जो कर्मचारी वर्ग परीक्षेच्या कामाला लागणार होता, तो सध्या करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे त्या कामी लागला आहे. या कर्मचारी वर्गाची या काही दिवसात तयारी करावी लागेल. परीक्षार्थींनी आपली तयारी ठेवावी, येत्या ८ दिवसांत परीक्षा होणार.”
मुख्यमंत्र्यांचे विद्यार्थ्यांना आवाहन
“तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून जर कोणी राजकारण करत असेल तर कृपया अशा लोकांना बळी पडू नका. कोणी भडकवत असेल तर भडकू नका, असं ते म्हणाले.”