मुक्तपीठ टीम
टीम इंडियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह लवकरच विवाह बंधनात अटकणार असल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. बुमराहचे स्पोर्ट्स अँकर संजना गणेशन हिच्यासोबत नाव जोडले जात असून येत्या १४ किंवा १५ मार्च दरम्यान गोव्यात लग्न करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेसी नाही. सर्वत्र सुरु असलेल्या जसप्रीत आणि संजनाच्या लग्नासंबंधितीच्या चर्चांवर दोघांनीही मौन बाळगले आहे. पण सोशल मीडियावर त्यांच्याबद्दलच्या बातम्या खूप वेगाने पसरत आहेत.
बुमराहने वैयक्तिक कारणास्तव इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यातून माघार घेण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) परवानगी मागितली, ही मंडळाने मान्य ही केली. तसेच कसोटी मालिकेनंतर इंग्लंडबरोबरच्या पाच सामन्यांच्या टी -२० मालिकेतही बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, बुमराहला लग्नासाठी अधिक वेळ हवा होता. त्यामुळे शेवटच्या कसोटीतून त्याने आपले नाव मागे घेतले होते. तर आता बुमराहला आयपीएल २०२१ च्या सामन्यात खेळताना पाहायला मिळणार आहे.
बुमराह, संजनाची गेल्या एक वर्षापासून सुरू झाली लिंक अप स्टोरी
बुमराह आणि स्पोर्ट्स अँकर संजना गणेशनची लिंक अप स्टोरी मागील वर्षी सुरू झाली. गेल्या वर्षी संजना देखील आयपीएलच्या फॅन शोचा भाग होती. त्यामुळे संजनाने बुमराहची अनेकदा मुलाखतही घेतली होती.
कोण आहे संजना गणेशन?
- संजनाने २०१२ मध्ये सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून बीटेक केले आहे.
- पदवीनंतर संजनाने एक वर्ष सॉफ्टवेअर अभियंता म्हणून काम केले.
- २०१४ मध्ये ती मिस इंडिया फायनलिस्ट होती.
- एमटीव्हीच्या स्प्लिट्सविला १४ या सीरीजनमध्ये संजना होती.
- या शोमध्ये काम केल्यानंतर संजनाने स्पोर्ट अँकर म्हणून करिअर करायचे ठरवले.
- संजना आयपीएलच्या मागील हंगामात कोलकाता नाईट रायडर्सच्या फॅन शोमध्ये सहभागी झाली होती.
- संजनाने आयपीएल लिलावाचे होस्ट म्हणून काम केले.
- २०१९ साली झालेला वनडे वर्ल्डकप तिने भाारताकडून होस्ट केला होता.