मुक्तपीठ टीम
कर्नाटकचे जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांना ‘सेक्स फॉर जॉब घोटाळा’ प्रकरणी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. दरम्यान, जारकीहोळी यांनी पत्रकार परिषद घेत असा दावा केला की, “आपल्याला मुद्दाम या प्रकरणात फसवलं गेलं आहे. तसेच मला राज्यातील एका महानेत्यानी यात अडकवलं आहे आणि सीडीमधील सदर महिलेला या कामासाठी पाच कोटी रुपये दिले गेले होते.”, असा आरोप आता जारकीहोळी यांनी केला आहे.
या प्रकरणानंतर प्रथमच रमेश जारकीहोळी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “मी एका षडयंत्राला बळी पडलो आहे. माझे राजकीय करिअर संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांच्या कुटुंबात वाद निर्माण करण्यासाठी कोणीतरी कट रचत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.”एक मोठा नेताही या षडयंत्राचा भाग आहे. मला या प्रकरणात फसवणाऱ्यांना मी तुरुंगात पाठवल्याशिवाय गप्प बसणार नाही”.
रमेश जारकीहोळी म्हणाले की, “मला सीडीबद्दल चार महिन्यांपूर्वी माहित होते आणि मी या प्रकरणी माझे भाऊ बाळचंद्र जारकीहोळी यांच्याशी चर्चाही केली होती. मला ही सीडीचे रिलीज होण्याच्या २ तास अधिच माहित होती. हि बनावट सीडी आहे. मला अडचणीत आणण्याची योजना दोन किंवा तीन जणांनी बनवली होती. या प्रकरणात मी आणखी काही बोलू इच्छीत नाही. माझा अपमान करणाऱ्यांना तुरुंगात पाठवल्याशिवाय मी शांत बसणार नाही.
दरम्यान, जारकीहोळी म्हणाले, या कटामध्ये सामील असणारा नेता हा बंगळुरुचा आहे. तो उत्तर कर्नाटकचा नाही. आम्ही उत्तर कर्नाटकमध्ये अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण करत नाही. अडचणीत असताना आम्ही आमच्या शत्रुंनाही मदत करतो. त्यामुळे, हे घाणरडं राजकारण बंगळुरू क्षेत्रातील लोकांकडून केलं जात आहे.