मुक्तपीठ टीम
ठाण्यात कोरोनाबाधीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असले तरी,रूग्णसंख्या वाढतच आहे. त्यामुळे शहरातील हॉटस्पॉटची संख्या पुन्हा १६ झाली आहे.मात्र ठाण्यात लॉकडाऊन नाही असे पालिकेने जाहीर केले आहे.
ठाणे शहरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवण्यास सुरूवात केली आहे.ठाणे महापालिका क्षेत्रात,तीन परिमंडळात १६ ठिकाणे कोरोनाची हॉटस्पॉट निश्चित केली आहेत. कोरोनाच्या लसीकरणाच्या कार्यक्रमाने वेग घेतला असून चाचण्या वाढवल्या आहेत. मात्र, ठाण्यात लॉकडाऊन नाही, असेही स्पष्ट केले आहे.
ठाण्यात सरसकट लॉकडाऊन नाही; सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र असणाऱ्या ठिकाणीच निर्बंध
महापालिकेचे ठाणेकरांना आवाहन
ठाणे महापालिका क्षेत्रात सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र असणाऱ्या ठिकाणीच निर्बंध घालण्यात आले असून शहरात कोणत्याही प्रकारे सरसकट लॉकडाऊन करण्यात आलेला नाही तरी ठाणेकरांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये असे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
सध्या महापालिका क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. वाढत्या संसर्ग रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाच्यावतीने तातडीने उपाय योजना करण्यात येत आहेत. ज्या परिसरात कोरोनाचा संसर्ग जास्त आहे त्या परिसरात हॅाटस्पॅाटची निर्मिती करण्यात आली आहे. या हॅाटस्पॅाट क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी कोविड १९ चे रूग्ण सापडले आहेत त्या ठिकाणी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्यात आले आहेत. या सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रामध्येच निर्बंध घालण्यात आले आहेत. कोरोनाचा संसर्ग आहे ती इमारत, त्या इमारतीमधील मजला तिथेच ३१ मार्च २०२१ पर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. उर्वरित ठिकाणचे सर्व व्यवहार यापूर्वी जसे सुरू होते त्यानुसार सुरू राहतील असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र वगळता शहरात कोणत्याही प्रकारे सरसकट लॉकडाऊन करण्यात आला नसून ज्या आस्थापना सुरु आहेत त्या आस्थापना यापुढेही सुरु राहणार आहेत. तरी ठाणेकरांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये तसेच नागरिकांनी सोशल डिस्टन्सींग, सॅनिटायझरचा वापर आणि मास्कचा वापर करण्याचे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
…………………………………..
हे आहेत ठाण्यातील कोरोना हॉटस्पॉट: