मुक्तपीठ टीम
राज्यातील आघाडी सरकारमध्ये सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा नेहमीच असते. काँग्रेसचे काही नेते सरकारच्या कामकाजात काँग्रेसला महत्व दिले जात नसल्याचा आरोप करत नाराजी व्यक्त करत असतात. आता शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांनी त्यांच्याच पक्षप्रमुखांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील महसलूमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. थोरात घटनाबाह्य, बेकायदेशीर काम करत आहे, त्यामुळे त्यांच्या खात्याशी संबंधित आदिवासी जमीन विक्रीची चौकशी करण्याची मागणी गावितांनी केली आहे. त्यानंतर ते दिल्लीला रवाना झाले आहेत.
राजेंद्र गावित यांचे स्वत:च्याच सरकारवर आरोप:
• महसूल विभागाकडून आदिवासींच्या जमिनीसंदर्भात घटनाबाह्यरित्या सरसकट परवानग्या
• मुंबई, ठाणे, पनवेल भागात जमिनींना मोठे भाव आले आहेत, त्यामुळे आदिवासी समाजाच्या जमिनींना मागणी वाढली आहे.
• महसूल मंत्री थोरात घटनाबाह्यरितीने काम करत आदिवासी जमीन विक्रीला परवानगी देत आहेत.
• राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार असताना अशा प्रकारच्या परवानग्या दिल्या जात नव्हत्या
• आता महसूल खात्याकडून सरसकट परवानगी दिली जात आहे.
• महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिलेल्या सर्व प्रकरणांची मुख्यमंत्र्यांनी तपासणी करुन योग्य ती करवाई करावी,” अशी मागणी राजेंद्र गावित यांनी केली आहे.
राजेंद्र गावित यांचे बदलते राजकारण
• राजेंद्र गावित हे आदिवासी नेते आहेत.
• ते नंदुरबारचे असले तरी त्यांचे राजकारण पालघर जिल्ह्यात करतात.
• काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये त्यांनी आदिवासी विकास मंत्री म्हणून काम पाहिले.
• पालघरचे तत्कालीन खासदार चिंतामण वनगा यांचे निधन झाले आणि २०१८मध्ये पालघर लोकसभा पोटनिवडणूक जाहीर झाली.
• काँग्रेस पक्षात असणाऱ्या गावितांनी हात सोडून भाजपचे कमळ हाती घेतले.
• त्या पोटनिवडणुकीत ते भाजपकडून खासदार म्हणून निवडून आले.
• २०१९ मध्ये पालघर लोकसभा क्षेत्र शिवसेनेकडे गेल्यानंतर राजेंद्र गावित हे भाजप सोडून शिवसेनेत दाखल झाले.
• त्या निवडणुकीत ते शिवसेनेचे खासदार म्हणून पालघर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले.
• गावित हे पक्षापेक्षा वैयक्तिक संपर्कातून राजकारण करण्यासाठी ओळखले जातात.