मुक्तपीठ टीम
मेळघाट व्याघ्र प्रकल्प म्हणजेच एमटीआरने मेळघाटातील ३५ स्थानिक आदिवासी तरुणांना संधी देऊन व्याघ्र संवर्धनाच्या दिशेने चांगले पाऊल टाकले आहे. एपीसीसीएफ आणि मेळघाटचे फील्ड डायरेक्टर एमएस रेड्डी म्हणाले की, ”परटवाडा येथील मेळघाट-प्रथम स्कील ट्रेनिंग सेंटरमध्ये या तरुणांना स्कील डेव्हलपमेन्ट प्रशिक्षण देण्यात आले.” दोन महिन्यांपूर्वी हे केंद्र सुरू झाल्यानंतर स्वयंरोजगार मिळविण्यासाठी ही पहिली बॅच आहे. रेड्डी म्हणाले, “या मागचा मुख्य हेतू म्हणजे जंगलात राहणाऱ्या या लोकांना आत्मनिर्भर बनवने.”
या केंद्राने ३६ तरुणांना सहाय्यक इलेक्ट्रिशियन होण्यासाठी प्रशिक्षण दिले. चार मुलींसह पहिली बॅच ६ मार्च रोजी पार पडली. ३६ तरुणांपैकी २३ जणांना नोकरीची जागा मिळाली आहे, तर सहा जण स्वत: कार्यशाळा उघडत आहेत. त्यापैकी काहींनी शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला आहे. मेळघाटातील समुदायाबरोबर काम करणारे प्रफुल्ल सावरकर यांच्या म्हणण्यानुसार, बॅच ७ जानेवारीपासून सुरू झाली. यामध्ये पंढरकवडा वन्यजीव विभाग आणि मेळघाट अंतर्गत पैनगंगा वन्यजीव अभयारण्यातील इको-डेव्हलपमेंट कमिटी असलेल्या खेड्यांमधील बेरोजगार तरुणांचा समावेश आहे.
स्थानिक तरुणांसाठी हा खरोखर एक चांगला प्रकल्प आहे जो त्यांना स्वयंरोजगार देऊन सक्षम बनलवतो. संपूर्ण कोर्सचे शुल्क मेळघाट टायगर कन्झर्वेशन फाउंडेशनने उचलले आहे. काही तरुणांना दरमहा ७,००० ची ऑफर मिळाली पण आत्मनिर्भर होऊन अधिक पैसे कमवू शकत असल्याने त्यांनी ती नाकारली.
पाहा व्हिडीओ: