मुक्तपीठ टीम
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज दुपारी २ वाजता विधानसभेत महाराष्ट्राचा २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. महाविकास आघाडी सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प असून राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पाच्या सुरुवातीलाच आरोग्य विभागावर करण्यात येणाऱ्या तरतूदी सादर करण्यात आल्या आहेत.
अर्थसंकल्प सादर करण्याच्या आधी अजित पवारांनी कोरोना योद्ध्यांचे आभार मानले आहेत. कोरोनासंकटामुळे राज्याच्या अर्थसंकल्पात यंदा आरोग्य विभागासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. तसेच, कोरोनामुळं सर्वच क्षेत्रातील आरोग्य सेवा सुधारीत करण्याची आवश्यकता निर्माण झाल्याचे अजित पवार यांनी म्हटलं आहे.
आरोग्य सेवेसाठी करण्यात आलेल्या तरतूदी
- कोरोनाच्या संकटात आरोग्य सेवेसाठी ७५०० कोटी रुपयांची तरतूद
- रुग्णालयांत आग प्रतिबंधक यंत्रणा लावण्यात येईल
- वैद्यकीय शिक्षण विभागासाठी १५१७ कोटी
- आरोग्य विभागाला २९०० कोटी रुपये मंजूर
- उस्मानाबाद, सिंधुदुर्ग, अमरावती, परभणीत मेडिकल कॉलेज उभारणार
- रुग्णालयांत आग प्रतिबंधक यंत्रणा लावण्यात येईल
- ११ परिचारिक प्रशिक्षण वर्गांचे महाविद्यालयात रुपांतर
मनपा क्षेत्रांसाठी ५ वर्षांत ५ हजार कोटी - लातूर जिल्हा बाह्यरुग्ण इमारतीसाठी ७३ कोटी
- ससून कर्मचारी निवास करिता २८ कोटी
- आटपाडीच्या ग्रामीण रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालय बनवणार
मोशीमध्ये आरोग्य प्रशिक्षण केंद्र उभारणार - राज्यात नवीन जिल्हा रुग्णालये, मनपा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणार येणार आहेत.
“२०२०-२१ च्या अर्थसंकल्पीय भाषणात मी कोरोना आजाराचे गांभीर्य विषद केले होते. या विषाणूच्या प्रसाराला भारतात त्यावेळी नुकतीच सुरुवात झाली होती. पण १५ दिवसात देशात लॉकडाऊन करावे लागले. कोरोनामुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीचा, त्यानंतर वर्षभर आपण अनुभव घेतला. आजही आपण लढतो आहोत. या लढाईत सामील झालेल्या कोरोना योद्ध्यांना मी आदरपूर्वक अभिवादन करतो. आजारात बळी पडलेल्या राज्यातील नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करतो. महिला पोलीस कर्मचारी, आशा वर्कर आणि सर्व महिला कोव्हिड वॉरीअरचा आदरपूर्वक उल्लेख करतो”, असं अजित पवार म्हणाले.