मुक्तपीठ टीम
स्टेट बँक ऑफ इंडियाने ‘एसबीआय अॅप्रेंटिसशिप २०२१’ या परीक्षेच्या संबंधित एक नोटिस जारी करत महत्तवाची माहिती दिली आहे. एसबीआयने नोटिस जारी करत सांगितले की, ‘एसबीआय अॅप्रेंटिसशिप २०२१’ ची परीक्षा स्थगित करण्यात आल्याचे सांगितले आहे. यानुसार जानेवारी २०२१ मध्ये होणारी परीक्षा एप्रिल २०२१ पर्यंत पुढे ढकलली आहे. परंतु एप्रिलमध्ये या परीक्षा केव्हा होणार यासंबंधित अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. बँकेकडून जारी केलेल्या नोटिफिकेशनमध्ये म्हटले आहे की, अॅप्रेंटिसशिप भरती परीक्षा २०२१ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना परीक्षेच्या तारखा आणि इतर माहितीसाठी जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर सातत्याने लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
या वेबसाइट्सवर ठेवा लक्ष
https://bank.sbi/careers
https://nsdcindia.org/apprenticeship
https://apprenticeshipindia.org or
http://bfsissc.com/
उमेदवाऱ्यांसाठी काही महत्वाच्या सुचना
- परीक्षेची प्रवेश पत्रे परीक्षेच्या काही दिवस आधी जाहीर केली जातील.
- प्रवेशपत्र प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवार एसबीआय अॅप्रेंटिसशिप २०२१ परीक्षा प्रवेश पत्र अधिकृत वेबसाइटवर डाउनलोड करू शकतील.
- या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून विविध राज्यातून सुमारे ८५०० रिक्त पदे भरले जातील.
वेतना संबंधित
अॅप्रेंटिसशिप पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना वेतन म्हणून पहिल्या वर्षी १५ हजार रुपये आणि दुसऱ्या वर्षी १६ हजार ५०० रुपये दिले जातील. तिसर्या वर्षी १९ हजार रुपये दिले जातील. तसेच या पदांशी संबंधित भरतीसह अधिक तपशीलांसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.