मुक्तपीठ टीम
वडिल बनण्याच्यावेळी भारतीय कर्णधार विराट कोहलीने क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहणे पसंत केले. सोशल मीडियावर बरीच चर्चा यावर रंगली होती, पण त्यात आणखी महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे वडील होण्याची जबाबदारी. कायद्याच्या नजरेतून पाहायला गेले तर महिलांना सहा महिन्यांची प्रसूती रजा दिली जाते. मात्र, पितृत्व रजेसाठी अद्याप कोणताही कायदा करण्यात आलेला नाही. पण सेवा नियमांतर्गत केंद्र सरकार वडिलांना १५ दिवसांची पितृत्व रजा दिली जाते. परंतु यावर कोणताही कायदा नसल्याने काही ठिकाणी पितृत्व रजा दिली जात नाही.
२०१७ मध्ये महाराष्ट्राचे खासदार राजीव सातव यांनी वडिलांच्या हिताचे संवर्धन करण्यासाठी पॅटेरनिटी बेनीफिट विधेयक सादर केले होते. ज्यात असंघटित व खाजगी क्षेत्रातमध्ये कमीत कमी १५ दिवसांची पितृत्व रजा देण्याचा प्रस्ताव असून त्यास तीन महिन्यांपर्यंत वाढविले जाऊ शकत होते पण त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले.
अखिल भारतीय सेवा नियमांतर्गत देशातील पितृत्व रजेच्या सध्याच्या स्थितीत केंद्र सरकार दोन मुलांच्या जन्माच्या वेळी पुरुष कर्मचार्यांना १५ दिवसांची रजा देते. पण आता याची मागणी तीव्र होऊ लागली आहे.
दरम्यान, अनेक वरिष्ठ अधिकारी अशा प्रकारचा कायदा झाला पाहिजे अशी मागणी करत आहेत. तसेच १५ दिवसांची पितृत्व रजा कमी असून या रजेत वाढ करण्याची गरज असल्याचे मत काहींनी व्यक्त केले आहे. कारण मुलांच्या जन्मानंतर वडिलांच्या जबाबदारीत वाढ होते.
या देशांमध्ये दिली जाते पितृत्व रजा
अद्याप देशात पितृत्वाची रजा घेण्याचा कुठलाही नियम किंवा कायदा नाही आहे. त्यामुळे सुट्टी द्यायची की नाही हे त्या त्या खाजगी कंपन्यांच्या निर्णयावर अवलंबून आहे. पण यात जेव्हा झोमॅटो कंपनीने सर्व पुरुष आणि महिलांना २६ आठवड्यांच्या पितृत्व रजेचे पॉलिसीची घोषणा केली तेव्हा सर्वच आश्चर्यचकित झाले. तसेच फिनलँडमध्येही सात महिन्यांची पितृत्व रजा देण्यात आली आहे. जरी बहुतेक देशांमध्ये पितृत्व रजा किंवा कायदा नसला तरीही बर्याच मोठ्या कंपन्यांमध्ये चार ते १६ आठवड्यांच्या कालावधीसाठी पितृत्व रजा दिली जात आहे.