मुक्तपीठ टीम
वाहन उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने अलीकडेच घोषणा केली की कंपनी २०२३ मध्ये 2WD थार लाँच करणार आहे. याबाबत नवीन माहिती समोर येत आहे की, ही नवीन ऑफ-रोडर एसयूव्ही नवीन कलर ऑप्शन्स आणि नवीन फीचर्ससह सादर केली जाऊ शकते.
आता नवे रंग, नवा ढंग! जाणून घ्या नविन महिंद्रा थारमध्ये काय आहे खास…
- SUV नवीन गोल्डन कलर शेडमध्ये दिसली आहे.
- ही रंग योजना सध्या XUV300 मध्ये उपलब्ध आहे.
- थारच्या कलर ऑप्शन्ससोबतच नवीन कॉपर कलर आणि व्हाईट कलर देखील यामध्ये सादर केली जाऊ शकतो असा अंदाज आहे.
- थारच्या 4WD मॉडलमध्ये नवीन रंग देखील पाहता येणार आहेत.
- नवीन महिंद्रा थारमध्ये अद्ययावत इंजिन दिले जाईल अशी अपेक्षा आहे.
- हे नवीन इंजिन १५०पीएस पॉवर जनरेट करण्यास सक्षम असेल आणि ट्रान्समिशनसाठी ६-स्पीड मॅन्युअल किंवा ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडले जाईल.
- ही गाडी २६ जानेवारी रोजी लाँच केले जाऊ शकते आणि त्याची किंमत सध्याच्या थारपेक्षा थोडी जास्त असू शकते.