मुक्तपीठ टीम
एप्रिल ते डिसेंबर २०२२ या कालावधीत भारतीय रेल्वेने प्रवासी विभागात एकूण अंदाजे उत्पन्न ४८९१३ कोटी रुपये इतके मिळवले असून गेल्या वर्षीच्या याच कालावधीत मिळालेल्या २८,५६९ कोटी रुपयांच्या तुलनेत त्यात ७१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
आरक्षित प्रवासी विभागात, १ एप्रिल ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत आरक्षण केलेल्या प्रवाशांची एकूण अंदाजे संख्या ५९.६१ कोटी आहे जी मागील वर्षी याच कालावधीत ५६.०५ कोटी होती, यामध्ये ६% ची वाढ दर्शवत आहे. १ एप्रिल ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत आरक्षित प्रवासी विभागातून प्राप्त झालेला महसूल ३८४८३ कोटी रुपये आहे जो मागील वर्षीच्या याच कालावधीतील २६४०० कोटी रुपयांच्या तुलनेत ४६% ची वाढ दर्शवतो.
अनारक्षित प्रवासी विभागात, १ एप्रिल ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत आरक्षण केलेल्या प्रवाशांची एकूण अंदाजे संख्या ४०१९७ लाख आहे जी मागील वर्षी याच कालावधीत १६९६८ लाख होती, यामध्ये १३७% ची वाढ झाल्याचे दिसून येते. १ एप्रिल ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत अनारक्षित प्रवासी विभागातून प्राप्त झालेला महसूल १०४३० कोटी रुपये आहे जो मागील वर्षीच्या याच कालावधीतील २१६९ कोटी रुपयांच्या तुलनेत ३८१% ची वाढ दर्शवतो.