मुक्तपीठ टीम
भारतात २०२२ वर्षी ओडिशा, बंगाल, चेन्नई ते मुंबई पर्यंत एकूण ८ अभिनेत्रींनी आत्महत्या केल्या आहेत. विशेष म्हणजे या सर्वांचे वय ३० वर्षांपेक्षा कमी आहे. त्यांच्या आत्महत्येचं कारणही एकच. एका वर्षात देशभरात ८ अभिनेत्रींच्या आत्महत्या झाल्या, या सगळ्या अभिनेत्री होत्या. परंतु, त्यात गाजल्या फक्त मुंबईच्या घटना हे असं का झालं? असाच प्रश्न उपस्थित झाला आहे.
१) अभिनेत्री तुनिषा शर्मा
- टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येने तिच्या कुटुंबासह तिच्या चाहत्यांनाही हादरवून टाकले आहे.
- २४ जानेवारीला तुनिषाने तिच्या शो ‘अली बाबा: दास्तान-ए-काबुल’च्या सेटवर मेकअप रूममध्ये गळफास लावून घेतला.
- ती फक्त २० वर्षांची होती.
- प्रेमात फसवणूक झाल्यामुळे तुनिषाने हे पाऊल उचलले.
- तिचा प्रियकर असलेल्या शीजान मोहम्मद खानला अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
- यावेळी शीजनने खुलासा केला की, तुनिषाने यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
२) सरस्वती दास
- बंगाली चित्रपटातील अभिनेत्री आणि मॉडेलने२८ आणि २९ मे रोजी गळफास लावून घेतली होता.
- ती केवळ १८ वर्षांची होती.
- नात्यातील तणावामुळे सरस्वतीने हे पाऊल उचलले होते.
३) पल्लवी डे
- १५ मे रोजी अभिनेत्री पल्लवीने आत्महत्या केली.
- २५ वर्षीय पल्लवीने गळफास लावून घेतली होती.
४) वैशाली ठक्कर
- ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ आणि ‘ससुराल सिमर का’ सारख्या टीव्ही शोची अभिनेत्री वैशालीने ऑक्टोबरमध्ये आत्महत्या केली.
- ती फक्त २० वर्षांची होती.
- माजी प्रियकर राहुल नवलानीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप.
५) बिदिशा डे
- मॉडेल आणि अभिनेत्री बिदिशा डे मजुमदार हिचा मृतदेह २५ मे रोजी तिच्या अपार्टमेंटमध्ये सापडला होता.
- प्रेमात अपयश आल्याने तिने २१ व्या वर्षात आत्महत्या केली.
६) रश्मिरेखा ओझा
- ओडिशा टीव्हीची नवोदित अभिनेत्री रश्मिरेखा हिने वयाच्या २३ व्या वर्षी जूनमध्ये आत्महत्या केली होती.
- यासाठी ती ज्याच्यासोबत राहत होती तिचा पार्टनर संतोष पात्रा याला जबाबदार धरण्यात आले.
७) मंजुषा नियोगी
- बंगाली अभिनेत्री मंजुषा नियोगी हिने खास मैत्रिणी बिदिशाच्या मृत्यूच्या दोन दिवसांनी मे महिन्यात आत्महत्या केली होती.
- २६ वर्षीय मंजुषा हिचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
८) पॉलीन जेसिका
- दक्षिण भारतीय अभिनेत्री पॉलिनने १७ सप्टेंबर रोजी चेन्नईत आत्महत्या केली होती.
- ती फक्त २९ वर्षांची होती.
- तिच्या लव्ह लाईफमध्ये अडचणी होत्या म्हणून तिने हे पाऊल उचलले होते.