मुक्तपीठ टीम
भारतीय विमानतळ प्राधिकरणाने उत्तर प्रदेशातील गैर-कार्यकारी संवर्ग पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. वित्त आणि इलेक्ट्रॉनिक्समधील वरिष्ठ सहाय्यकांच्या एकूण ५३ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २० जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज करू शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
पद क्रमांक १-
- वरिष्ठ सहाय्यक (वित्त) पदांसाठी बी कॉम आणि ३ -६ महिन्यांचे संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावे.
- संबंधित विषयातील २ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
पद क्रमांक २-
- वरिष्ठ सहाय्यक (इलेक्ट्रॉनिक्स) पदांसाठी, इलेक्ट्रॉनिक्स/ दूरसंचार/ रेडिओ अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा असावा.
- किमान २ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
पद क्रमांक ३
- वरिष्ठ सहाय्यक (राजभाषा) साठी, इंग्रजीसह हिंदीमध्ये पीजी किंवा इंग्रजीमध्ये पीजी पोस्ट ग्रॅज्युएशनसह हिंदीमध्ये पदवी असावी.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ३० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून सर्वसाधारण, मागासवर्ग आणि ओबीसी उमेदवारांसाठी १००० शुल्क आकारले जाणार तर एससी, एसटी, दिव्यांग आणि महिला उमेदवारांना शुल्कातून पूर्णपणे सूट देण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकृत वेबसाइट www.aai.aero वरून माहिती मिळवू शकता.