मुक्तपीठ टीम
भारतीय वायूदलाने आज एसयु-३० एमकेआय (सुखोई) विमानातून जहाजाच्या लक्ष्यावर, ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या विस्तारित श्रेणीच्या आवृत्तीची यशस्वी चाचणी घेतली. या क्षेपणास्त्राने बंगालच्या उपसागरात लक्ष्याचा अचूक वेध घेतला. यासह, आयएएफने एसयु-३० एमकेआय विमानातून जमिनीवर/समुद्री लक्ष्यांवर खूप लांब पल्ल्यांवरील अचूक मारा करण्याची महत्त्वपूर्ण क्षमता वाढवली आहे.
एसयु-30 एमकेआय विमानाच्या उच्च कार्यक्षमतेसह क्षेपणास्त्राची विस्तारित श्रेणी क्षमतेमुळे भारतीय वायूदलाला सामरिकदृष्ट्या धोरणात्मक बळ मिळाले आहे आणि परिणामी ते भविष्यातील युद्धक्षेत्रांवर प्रभुत्व मिळवून देत आहे. आयएएफ, भारतीय नौदल, डीआरडीओ, बीएपीएल आणि एचएएल यांच्या समर्पित आणि एकत्रित प्रयत्नांमुळे हे यश साकारले आहे.