मुक्तपीठ टीम
केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजेच सीआरपीएफने सहाय्यक उपनिरीक्षक च्या १४३ पद आणि हेड कॉन्स्टेबलच्या १३१५ पद अशा एकूण १४५८ पदांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २५ जानेवारी २०२३ पर्यंत अर्ज करु शकतात. अर्ज प्रक्रिया ०४ जानेवारी २०२३ पासून सुरु होईल.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
पद क्र.१
- हेड कॉन्स्टेबल पदांसाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून १२वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
- उमेदवारांना संगणकावर हिंदीमध्ये किमान ३० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजीमध्ये ३५ शब्द प्रति मिनिट टायपिंगचा वेग असावा.
पद क्र.२
- एएसआय स्टेनो पदांसाठी १२वी उत्तीर्ण पाहिजे.
- ५० मिनिटांत इंग्रजीमध्ये ८० शब्द या वेग असावा.
- १० मिनिटे लघुलेखन करता आले पाहिजे.
- ६५ मिनिटांत हिंदीमध्ये लिहू शकतील.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी नसावे आणि २५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून १०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ महिला उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी सीआरपीएफच्या अधिकृत वेबसाइट https://crpf.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.
नोकरीची लिंक
https://crpf.gov.in/recruitment-details.htm?246/AdvertiseDetail
अधिकृत जाहिरात
https://crpf.gov.in/writereaddata/Portal/Recruitment_Advertise/ADVERTISE/1_246_1_622122022.pdf