मुक्तपीठ टीम
राहुल गांधींचा ही फ्लाइंग किस अदा तशी भाजपासाठीची. राजकीयच पण त्यांची ही अदा पॉलिटिकल असली तरी ती लाखो तरूणींना भावणारी! राहुल गांधी हे भारतातील सध्याचे मोस्ट एलिजेबल बॅचलर आहेत. अनेक तरूणींच्या ह्रदयाची धडधड वाढवणाऱ्या राहुल गांधी यांनी अजूनही लग्न केलं नाही. लोक त्यांच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर करताना दिसत आहेत. एका यूट्यूब वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी एक असे विधान केले की त्याची चर्चा सर्वत्र सुरु झाली आहे. ते म्हणाले की, मला लग्नासाठी अशी मुलगी आवडेल, जिच्यामध्ये त्यांची आजी इंदिरा गांधी आणि आई सोनिया गांधी यांचे गुण मिसळले असतील. राहुल गांधींना त्यांच्या आजीसोबतच्या नात्याबद्दल बोलले की ती त्यांच्या आयुष्यातील प्रेम आहे. ती माझी दुसरी आई होती. आता जाणून घेऊया राहुल गांधींना नेमकी वधू पाहिजे तरी कशी…
राहुल गांधी अशा मुलीच्या शोधात…
- इंदिरा गांधींसारख्या गुणांच्या मुलीशी लग्न करायला आवडेल का, असे विचारले असता ते म्हणाले की हा एक मनोरंजक प्रश्न आहे.
- मला अशी मुलगी हवी आहे जिच्यात माझ्या आजी आणि आईचे गुण मिसळलेले आहेत.
- ते म्हणतात, त्यांना कोणी ‘पप्पू’ म्हटले तरी वाईट वाटत नाही, कारण हा सर्व प्रचाराचा भाग आहे आणि असे बोलणारे स्वत:च त्रस्त आणि घाबरलेले आहेत.
- जो बोलत आहे त्याच्या आत भीती आहे.
- त्यांच्या आयुष्यात काहीच नाही, त्यांचे संबंध चांगले चालले नाहीत.
- जर त्यांना मला शिवी देण्याची गरज वाटत असेल तर मला शिवी द्या, मी त्याचे स्वागत करेन.
- तुम्ही मला शिवी दिलीस म्हणून… मी तुमचा तिरस्कार करणार नाही असेही राहूल गांधी यांनी स्पष्ट केले.
‘माझ्याकडे कोणतीही वैयक्तिक कार नाही’ – राहूल गांधी
- त्यांनी वाहने आणि बाईक्सबद्दल सविस्तर चर्चा केली.
- त्यांच्याकडे स्वतःची कोणतीही वैयक्तिक कार नाही,
- त्यांच्या आईकडे एक कार आहे.
- ते लंडनमध्ये राहायचो तेव्हा ते ‘२० रुपयाची’ बाईक चालवत असत, कोट्यवधी तरूणांप्रमाणे ती बाईक ही त्यांच्या आयुष्यातील एक प्रेम होते.
- राहुल गांधी म्हणाले की, मी कोणाचाही द्वेष करत नाही.
- राहुल गांधींनी सांगितले की, त्यांना सायकल चालवायला आवडते आणि एकदा त्यांना लॅम्ब्रेटाही आवडली.
एकूणच राहुुल गांधींनी आता प्रथमच वधू पाहिजे कशी, त्याबद्दल मन मोकळं केलंय. पाहूया आता नेमकं कधी ते भारत जोडोप्रमाणेच जीवनाचं नातं जोडतात…
पाहा: